तिने विकला अन् त्याने खरेदी केला.... 33 करोड रुपयांमध्ये मुलाने खरेदी केली मुलीची आत्मा; रक्ताने साईन झाला कॉन्ट्रॅक्ट
या जगात पैशाला जितकी किंमत आहे तेवढी किंमत कशालाच नाही. पैसे आपल्याकडून हवं ते आणि हवं तसं काहीही करून घेऊ शकतं… असा डायलॉग तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकला असेल पण तुम्ही याचेच जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. घटना जरा भयानक आणि कोड्यात टाकणारी असली तरी सत्यात ती घडली आहे आणि हेच खरं आहे. सोशल मिडियावर नुकतीच एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे ज्यात एका पुरुषाने तब्बल ३३ कोटी रुपयांना मुलीचा आत्मा खरेदी करण्याची बाब समोर आली आहे. मुलाने आत्मा खरेदी तर केला पण त्या आत्म्याचं आता करायचं काय या प्रश्नाने त्याला चिंतेत पाडलं. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
डेली स्टारच्या एका वृत्तानुसार, रशियामध्ये एका विचित्र व्यवहाराने स्थानिक मिडिया तसेच सोशल मिडियावर धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आहे. घडलं असं की, दिमित्री नावाच्या एका व्यक्तीने सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म व्हिकॉन्टाक्टेवर (Vkontakte ) विनोदाने एक पोस्ट शेअर केली, यात त्याने तो कोणाचा तरी आत्मा खरेदी करु इच्छित आहे अशी कल्पना व्यक्त केली. सुरुवातीला लोकांना हा विनोद वाटला पण पुढे जाऊन हे खरे ठरले. खरंतर करिना नावाच्या एका महिलेने त्याची ही ऑफर स्वीकारली आणि $4 दशलक्ष (अंदाजे 33 कोटी रुपये) मध्ये तिने आपला आत्मा विकून टाकाला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी यासाठी रक्ताने माखलेला कॉन्ट्रॅक्ट पेपर तयार केला, ज्यावर स्वाक्षरी करुन हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यात आला. काही दिवसांनी दिमित्रीने त्यांचा हा करार सोशल मिडियावर शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “मी नुकताच माझा पहिला आत्मा खरेदी केला. हा रक्ताने स्वाक्षरी केलेला करार आहे. मला डेव्हि जोन्ससारखे वाटते”.
आत्मा विकणाऱ्या करीनाने स्थानिक माध्यमांना सांगितले की, तिने तिला तिच्या निर्णयाबद्दल काहीही चुकीचे वाटत नाही वा कोणता पश्तात्ताप होत नाही. करिनाने स्पष्टपणे सांगितले की, तिला लोकांच्या मताची पर्वा नाही, तिने आत्मा विकून मिळवलेल्या पैशाने लाबूबू डाॅल्सचा संग्रह आणि प्रसिद्ध गायिका नादेझदा कादिशेवा यांच्या कॉर्न्सर्टची तिकीटे खरेदी केली. दुसरीकडे आत्मा खरेदी करणाऱ्या दामित्रीने सांगितले की, त्याने विनोद म्हणून पोस्ट शेअर केली होती आणि त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की एखादी महिला ही ऑफर स्वीकारेल. आता मात्र त्याला त्याने विकत घेतलेल्या या महिलेच्या आत्म्याचे काय करावे याची काळजी वाटत आहे. ही घटना आता इंटरनेटवर चांगलीच ट्रेंड करत असून यावरुनच आजकाल लोक पैशासाठी फक्त आपले शरीरच नाही तर आत्मेही विकत आहेत ही धक्कादायक बाब समोर येते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.