(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जोथे नेहमीच असंख्य व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. इथे दिसून येणाऱ्या दृश्यांची कल्पना आपण कधीही करू शकत नाही कारण इथे नेहमीच अनेक अनोखे व्हिडिओज शेअर केले जातात. अशातच सध्या इंटरनेटवर एका कपलच्या प्री व्हेंडिंग शूटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात त्यांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून आले. कपलचा असा ऑन द स्पॉट पोपट होताना पाहून युजर्सना हसू अनावर झाले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करण्यात सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका निळ्याशार पाण्याच्या प्रवाहासमोर बीचवर एक कपल आपला व्हिडिओ शूट करण्याच्या विचारात असतात. समुद्रकिनाऱ्यावर प्री-वेडिंग शूट करणं अनेकांचं स्वप्न असतं आणि हे कपल देखील याच विचाराने इथे आलेले असतात. अशात व्हिडिओ सुरु होतो, कपल आपले सुंदर क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी सज्ज होतात. पण तितक्यातच एक चूक होते आणि कपलच्या सर्व प्लॅनवची निव्वळ फजिती होऊन बसते. घडतं असं की, मुलगा मुलीची कंबर पकडून तिला उचलून हवेत फिरवण्याचा प्रयत्न करतो पण तितक्यातच त्याची पकड सैल पडते दोघेही वाळूवरील एका दगडाला जाऊन धडकतात. दोघेच हलकेच खाली आदळल्याने त्यांना फार काही दुखापत होत नाही पण हे दृश्य पाहून युजर्सना मात्र हसू अनावर होते.
Pre-wedding shoot became WWE 😭😂 pic.twitter.com/FfSXF03Qfm
— Jeet (@JeetN25) September 16, 2025
दरम्यान कपलचा हा व्हायरल व्हिडिओ @JeetN25 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला मिश्किल कॅप्शन देण्यात आलं आहे ज्यात, ;लग्नापूर्वीचे शूट WWE बनले’ असं लिहिलं आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्री व्हेंडिंग शूट भविष्यासाठी खूप कठीण झाले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भारतात अर्धे लोक पागल झाले आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अजून करा प्री व्हेंडिंग शूट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.