(फोटो सौजन्य: Instagram)
पती पत्नीचं नातं इतर नात्यांहून बरंच वेगळं असतं. परंपरेनुसारच, जेव्हा दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकतात तेव्हा त्यांचे सर्व सुख दुःख एकत्र होतात. फक्त सुखातच नाही तर वाईट काळातही एकमेकांची साथ कधीही सोडणार अशी शपथ ते घेतात पण विचार करा जर नवरा बायको या दोन्हीच्या जबाबदाऱ्या त्यांच्या कामाशी भिडणाऱ्या आणि विरुद्ध असतील तर काय होईल… सध्या एक मजेदार विदेही इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यात एक प्रोटेस्ट सुरु असून पोलीस त्यांचा विरोध करताना दिसून आले. पण यात लक्षवेधी ठरलं ते एक जोडपं, ज्यात महिला निदर्शने करत प्रोटेस्ट करत होती तर तिचा नवरा एक पोलीस अधिकारी असून सर्वांसमवेत तिला रोखण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही आपापली जबाबदारी पार पाडत होते आणि अशातच महिलेने अशी गोष्ट केली ज्याने संपूर्ण घटनेची दिशाच बदलून टाकली. चला व्हिडिओत व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या नवरा-बायकोच्या या व्हिडिओमध्ये, महिला पोलीस नवऱ्यासमोर निदर्शने करताना दिसून आली. नवरा आपली जबाबदारी निभावत तिला बाकी लोकांप्रमाणेच तिलाही पुढे जाण्यापासून रोखत असतो आणि तितक्यातच व्हिडिओला एक रोमांचक वळण येते. महिला पुढच्याच क्षणी चालू प्रोटेस्टमध्ये आपल्या पतीला डोळा मारते जे पाहून नवरा पोलीस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमलत. तो लाजतो आणि लगेच आपले तोंड दुसऱ्या दिशेला वळवतो. हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक यावर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हा व्हिडिओ @shivamkmr111998 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा पत्नी सरकारविरुद्ध निषेध करते आणि पती पोलिसात असतो आणि ते एकमेकांना तोंड देतात, तेव्हा असे घडते’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यामध्ये तर पतीची हार निश्चित आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर खरोखरच असे घडले तर सरकार आणि पोलिस प्रशासन दोघेही शरण जातील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरंतर तो त्याच्या पत्नीचे रक्षण करतोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.