काटेरी जीभ बाहेर काढताना दिसला एक भयावह जीव, Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल
सध्या देशभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाने मुंबईला तर अक्षरशः झोडपून टाकले आहे. आता पावसानंतर गोरेगावमध्ये एक विचित्र घटना घडून आली आहे. गोरेगाव पूर्व गृहनिर्माण सोसायटीत एक विचित्र प्राणी आढळून आला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओतील प्राण्याचे थरारक रूप पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. त्याचे हे रौद्र रूप पाहून तुमचेही हातपाय थरथर कापू लागतील.
ही घटना बुधवारी मुसळधार पावसानंतर घडून आली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झाले असे की, मुसळधार पावसाच्या प्रभावामुळे आयएमडीने मुंबईत रेड अलर्ट जारी केला होता. मुसळधार पावसात गोरेगाव येथील एका गृहनिर्माण संस्थेत यावेळी हा प्राणी रेंगताना दिसून आला. या प्राण्याला पाहून आता अनेकजण भयभीत झाले आहेत. त्याचे रौद्र रूप पाहून कोणाचीही पळताभुई एक होईल.
हेदेखील वाचा – शौक बडी चीज है! बायकोला बिकिनी घालता यावी म्हणून नवऱ्याने संपूर्ण बेटच खरेदी केलं, किंमत ऐकून आवाक् व्हाल
व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा एक प्राणी आपली काटेरी जीभ बाहेर काढून चालताना दिसत आहे. मात्र हा व्हायरल व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर तो रेंगाळणारा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून घोरपड असल्याचे समोर आले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हा सरपटणारा प्राणी एका घराबाहेरील परिसरात रेंगाळताना दिसत आहे. घोरपडीची भितीदायक काटा असलेली जीभही व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.
हेदेखील वाचा – दूध समजून विदेशी तरुणाने प्यायली भांग, म्हणाला भारतात कधीही… हॉस्पिटलमधील धक्कादायक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @andheriwestshitposting नवाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “गोरेगाव पूर्व गृहनिर्माण सोसायटीत सरडा दिसला आहे, सरड्याच्या सुरक्षिततेबद्दल खूप काळजी आहे” असे लिहिण्यात आले आहे. अनेक युजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेकांनी हा सरडा नसून घोरपड असल्याचेही स्पष्ट केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “कृपया इजा करू त्याला नका. बचावकर्त्यांना कळवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही तर घोरपड आहे”.