शौक बडी चीज है हा फेमस डायलॉग तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये अनेकदा ऐकलं असेल. या डायलॉगला साजेशी अशी बातमी समोर आली आहे. UAE म्हणजेच संयुक्त अरब एमिरेट्स हा जगातील वेगाने वाढणारा दुसरा दुसरा विकसित देश आहे. येथील लोकांची जीवनशैली. येथील इमारती, रस्ते, पोलिस आणि लोकांची खर्च करण्याची शैली जगभर प्रसिद्ध आहे. UAE मधील सर्वात प्रसिद्ध शहर दुबई आहे. अनेक अब्जाधीश शेख दुबईत राहतात. ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. ही संपत्ती दाखवण्यासाठी दुबईतील शेख काही मागे हटत नाहीत.
सध्या एक विचित्र घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच एका अब्जाधीश शेखने आपल्या पत्नीसाठी करोडोंचे बेट विकत घेतले आहे. पण या मागचे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल. हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – दूध समजून विदेशी तरुणाने प्यायली भांग, म्हणाला भारतात कधीही… हॉस्पिटलमधील धक्कादायक Video Viral
दुबईतील एका गृहिणीला बिकिनी घालून मोकळेपणाने फिरता यावे म्हणून तिच्या नवऱ्याचे थेट संपूर्ण बेटच विकत घेतले आहे. सौदी अल नादक (वय 26) या महिलेने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ही बातमी शेअर केली आहे. तसेच पर्सनल बेटाचा व्हिडीओदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला 25 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
हेदेखील वाचा – मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य
मुळची युकेमधील असलेल्या सौदी अल नादकने दुबईतील उद्योगपती जमाल अल नादकबरोबर लग्न केलं. दुबईत एकत्र शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सौदी अल नादक ही इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या जीवनशैलीचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. त्यातीलच एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हे बेट आशिया खंडात असून त्याची किंमत 50 दशलक्ष डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 418 कोटींहून अधिक होते.
सौदीने मागील आठवड्यात नवऱ्याने तिच्यासाठी घेतलेल्या बेटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. आम्ही गुंतवणूक म्हणून हे बेट घेतलं आहे. जेणेकरून मला बिकिनी परिधान करून बिनधास्त फिरता येईल. मी सुरक्षित राहावी, अशी माझ्या पतीला चिंता होती. म्हणून त्यानं थेट बेटच विकत घेतले,. असे सौदीने व्हिडिओत म्हटले आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांना कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी चांगल्या तर काहींनी काहींनी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही अशी टीका केली आहे.