ट्रेन बनली कुस्तीचा 'आखाडा'! सीटनवरुन आजीबाईंशी पंगा घेणं महिलेला पडलं महागात; लाथा-बुक्क्यांचा मारा अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यामध्ये दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी सुरु आहे. जागेवरुन एका महिला आणि आजीबाईमध्ये वाद सुरु झाला होता. ज्याचे पुढे मारामारीत रुपांतर झाले. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वेचा डबा प्रवाशांनी खचाखच भरलेला आहे. अनेकजण उभ्याने प्रवास करत आहे. एक आजी एका सीटवर आडव्या पडलेल्या आहे. बर्थ पूर्ण व्यापलेला असताना लोकांना जागा देण्याऐवजी आजीबाई आरामात झोपलेल्या आहेत. याच वेळी एक महिला आजीबाईंना उठण्यास सांगते. पण त्या उठण्यास नकार देतात. दुसरी महिला अजून आग्रह धरते त्यांना बळजबरीने उठवण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे आजीबाईंना राग येतो आणि काही क्षणातंच संपूर्ण प्रवाशांचा होश उडतात.
अजबच! महिलेने पुरुषांना उचलून जमिनीवर पटकण्याचा बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीजने शेअर केला Video
व्हायरल व्हिडिओ
Occupying entire seats like bulls is a serious problem in Indian trains. People lie down and take up the whole seat, using illness as an excuse. If you are that sick, book an ambulance and take them to a hospital. Trains are public transport. A seat meant for 4 people cannot… pic.twitter.com/VQXsyZBO2T — Oppressor (@TyrantOppressor) March 14, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TyrantOppressor या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी तीव्र टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सार्वजनिक वाहतूक म्हणजे सामायिक जागा आणि सामायिक जबाबदारी आहे, तर दुसऱ्या एकाने चार लोकांसाठीची जागा आजीबाईंनीच व्यापली आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने आजीबाईंचा स्वॅगच निराळा आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड राडा घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






