IIT रुरकीच्या मेसमध्ये कढई-कुकरमध्ये उड्या मारताना दिसले उंदीर
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे आपला संताप वाढतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहून धक्का बसेल.
व्हायरल व्हिडिओ IIT रुरकीचा आहे. या व्हिडिओने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. IIT रूरकीच्या मेसचा एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तराखंडच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीच्या विद्यार्थ्यांनी मेसमध्ये उंदीर उड्या मारत असल्याचे दिसले आहे. यामुळे रुरकीच्या विद्यार्थ्यांनीमध्ये गोंधळ उडाला आहे. हा व्हिडिओ संस्थेच्या राधाकृष्ण भवनच्या ‘मेस’च्या स्वयंपाकघरातील असल्याचा दावा केला आहे.
मेसमध्ये उडी मारणारे उंदीर
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेसमध्ये काही भांडी दिसत आहेत. ज्यामध्ये उंदीर उड्या मारताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी अन्नपदार्थ व भांड्यांवर उंदीर उड्या मारल्याचे पाहिल्यानंतर गोंधळ घातला आहे. तसेच मेसमध्ये अस्वच्छता ही दिसत आहे. दरम्यान, संस्थेने मेसमधील खाद्यपदार्थांमध्ये उंदरांची उपस्थिती नाकारली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले आहे. आयआयटीच्या मीडिया सेलच्या प्रमुख सोनिका यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून मेसमधील खाद्यपदार्थांमध्ये उंदीर असल्याचा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
IIT Roorkee के मेस के खाने मैं मिले चूहे। वीडियो मैं देखें…#iitroorkee pic.twitter.com/os0CK8Qgc0
— Neha Bohra (@neha_suyal) October 17, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @neha_suyal या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देत संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, मेस किती अस्वच्छ आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यावर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे, आणखी एका युजरने म्हटले आहे की, जेवण बनवणाऱ्यांचे पाहूणे असतील बहुतेक, तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे अशा घटनांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रीया लेकांनी दिल्या आहेत.