फोटो सौजन्य: iStock
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्या पाहिल्यावर आश्चर्य वाटते. तर अनेकदा हास्यास्पद गोष्टी पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण अशा अनेक गोष्टींचे मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व्हायरल झालेल्या देखील पाहिल्या असतील. सध्या अशीच एक भन्नाट उत्तर पत्रिका व्हायरल होत आहे. जी पाहिल्यावर तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.
विद्यार्थी पेपरमध्ये काय उत्तर देईल याचा शिक्षकाला देखील अंदाज नसतो. तुम्ही छान सुंदाक्षर असलेल्या तसेच चांगले मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तरपाहिल्याच असतील पण कधी कधी अभ्यास न केल्यामुळे पेपरमध्ये भन्नाट उत्तर लिहिलेल्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका देखील व्हायरल होत असतात. ज्यामध्ये असे उत्तर लिहिलेले असते की शिक्षकाचे डोके चक्रावून जात असेल. सध्या व्हायरल होत असलेली उत्तरपत्रिका देखील अशीच आहे. ज्यामुळे शिक्षकाचे डोके चक्रावले आहे.
तबडक…तबडक…तबडक
व्हायरल होत असलेली उत्तर पत्रिका संगम युनिव्हर्सिटी शिक्षण संस्थेची आहे. एका इतिहासाच्या पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे विद्यार्थ्याने असे उत्तर लिहिले आहे की, शिक्षकाचे डोके चक्रावले आहे. आशिष कुमार उर्फ गोल्डी नावाच्या विद्यार्थ्याने हिंदी भाषेतील प्राचीन इतिहासाच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला आहे. ज्यामध्ये झेलम युद्धाबाबत त्याला 300 शब्दात वर्णन करायचे आहे. त्याने या प्रश्नाचे उत्तर लिहिले आहे की, युद्ध सुरू असताना सिंकंदरचा घोडा कसा धावत होता तबडक तबडक तबडक तर सिकंदर वर कसा हल्ला करण्यात आला साये साये साये असे त्याने लिहिले आहे. यानंतर त्याने शेवटी वो सिकंदर ही कहलाता है, हारी बाजी को जितना जिसे आता है असे लिहिले आहे. तसेच शिक्षकाने देखील यावर त्याला असा रिमार्क दिला आहे की, वाचून लोटपोट व्हाल.
हे देखील वाचा- रावणाचा वध कोणी केला? चिमुकल्याचे उत्तर ऐकून पोट धरून हसाल; व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल पोस्ट
Teacher ke Fisaddi remark ne student ke life mein kiya Kalesh 🙂↔ pic.twitter.com/61jJtNkpA9
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
ही उत्तर पत्रिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेकांनी आपल्या भन्नाट अशा प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा मुलगा मोठा होऊन भविष्यात देशाचा पंतप्रधान होईल हे लिहा. सर्व गुण त्यांचे आहेत तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, उत्तर 100 पैकी 100 मार्कांचे आहे आणखी एका युजरने म्हटले आहे की, ओएमजी, यावर शब्द सापडत नाहीयेत तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला गोड कलेश अशा अनेक प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.