शेवटी कलियुगच हे! नातवाने आजीला बॅटने मारलं, ती रडत राहिली पण... काळीज पिळवटून टाकणारा Video Viral
आजी आणि नातवाचे नाते सर्वात सुंदर नातं म्हणून ओळखलं जात. या जिव्हाळा, काळजी, प्रेम तुडुंब भरलेला असतो. आजी-आजोबांचे आपल्या नातवांसोबत असलेले नाते हे वेगळेच असते. जुनी पिढी आणि तरुण पिढीतील गोड संमिश्र येत पाहायला मिळते. नात्याची खरी जडण घडण इथूनच होत असते. मात्र आजच्या काळात हे नातं कुठं तरी हरपत चालले आहे. मुलं आपल्या आजी-आजोबांशी दूर होत चालले आहे. तसेच नात्यातील आदरच यात राहीला नाही. याचेच एक धक्कादायक उदाहरण सध्याच्या व्हायरल व्हिडिओतील दिसून आले आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एक अस्वस्थ करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एक तरुण चक्क आपल्या आजीला क्रिकेटच्या बॅटने मारताना दिसून येत आहे. रायपूरच्या पुरानी बस्ती पोलिसांच्या अखत्यारीतील अमर पुरी भागात ही धक्कादायक घटना घडली असून त्याचा काळीज हेलावून टाकणारा हा व्हिडीओ सध्या अनेकांचे होश उडवून टाकत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचाही राग अनावर होईल.
हेदेखील वाचा – जीवाशी खेळ! मस्ती मस्तीत पेटता सुतळी बॉम्ब तरुणाने टाकला मित्राच्या तोंडात अन्… धक्कादायक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने अनेकांना थक्क करून टाकले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुण बॅट घेऊन आपल्या वृद्ध आजीच्या दिशेने जात असतो. यानंतर तो आपल्या आजीसमोर उभा राहतो आणि तिला काही गोष्टी सुनावू लागतो. यांनतर आजी काय बोलणार तितक्यात हा तरुण आपली बॅट उंचावतो आणि आपल्या आजीला या बॅटने जोरदार फटका मारतो. यांनतर तो तिथून निघून जातो पण ही आजी मात्र वेदनेने कळवत राहते. हृदय हेलावून टाकणारा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत असून लोक यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
कोई कैसे अपनी दादी को इस तरह बैट से पीट सकता है!
दादी जिसने बचपन में चलना सिखाया उसी को बेरहमी से पीटना बहुत दुखद है।
हमारे समाज के लिए भी चिंताजनक है
वीडियो छत्तीसगढ़ की राजधानी रायपुर का है
@gyanendrat1 pic.twitter.com/Rg1nScGCbf
— Ravi Miri (Vistaar News) (@Ravimiri1) November 5, 2024
हेदेखील वाचा – या किड्याचे नाव ‘ ‘Donald Trump’ का आहे? वैज्ञानिकांचे कारण ऐकून पोट धरून हसाल
हा हृदयद्रावक व्हिडिओ @Ravimiri1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 70 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच बऱ्याच लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा नालायक मुलांना फक्त प्रत्येक गोष्टीतून हाकलून लावू नका, तर त्याला या बॅटने दोनदा मारा, नंतर एफआयआर नोंदवा आणि शुद्धीवर येईपर्यंत त्याला काही दिवस तुरुंगात पाठवा, अशा मुलांना वेळीच सुधारले नाही तर ते नियंत्रणात राहणार नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”शिक्षणाच्या प्रयत्नात पालक संस्कार करायला विसरले! नवी पिढी पैसे कमवण्यासाठी तयार झाली आहे. पैसा आणि स्टेटस समोर कोण कोणाला ओळखणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.