Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालकिणीसमोरच पिटबूलाने घेतला भटक्या श्वानाचा जीव, फाडून फाडून खात राहिला अन् महिला पाहत होती मजा; धक्कादायक Video Viral

Pitbull Attack On Stray Dog: असंवेदनशीपणाचा कहर! पिटबूलाने ओरबाडत श्वालाना खाल्ले आणि मालकीण खुल्या डोळ्याने हा तमाशा पाहत राहिली. या भयावह घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून लोक कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 25, 2025 | 10:47 AM
मालकिणीसमोरच पिटबूलाने घेतला भटक्या श्वानाचा जीव, फाडून फाडून खात राहिला अन् महिला पाहत होती मजा; धक्कादायक Video Viral

मालकिणीसमोरच पिटबूलाने घेतला भटक्या श्वानाचा जीव, फाडून फाडून खात राहिला अन् महिला पाहत होती मजा; धक्कादायक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

शरीराची रचना आणि रागीट स्वभावामुळे पिटबुलची गणना धोकादायक कुत्र्यांच्या श्रेणीत केली जाते. 8 ते 15 वर्षे जगणारा हा प्राणी कोणावरही हल्ला करू शकतो आणि याला हल्ला करण्यापासून रोखणे हे सर्वात कठीण काम आहे. असे अनेक व्हिडिओ यापूर्वीही इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये पिटबुल बिबट्यासारख्या प्राण्यांवरही हल्ला करताना दिसला आहे. सध्या देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हे ज्यात पिटबुलाने भररस्त्यात एका भडक्या श्वानावर हल्ला चढवल्याचे दिसून आले आहे. मुख्य म्हणजे, या घटनेत पितंबूलाची मालकीण देखील तिथे उपस्थित होती मात्र काहीही न करता ती हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी फक्त बघत राहिली ज्यामुळे आता सोशल मीडियावर मालकिणीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नक्की काय आणि कसं घडलं ते जाणून घेऊयात.

नुकतीच महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये एक भयानक घटना घडून आली. येथे एका पिटबुलने एका भटक्या कुत्र्यावर क्रूर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही संपूर्ण घटना तेथील सिसिटीव्ह कॅमेऱ्यात कैद झाली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये, पिटबुल भटक्या कुत्र्याचा जीव घेत त्याला चावताना दिसत आहे. पिटबुलची मालकीण तिथे उभी होती, पण ती पूर्ण वेळ काहीही न करता हा सर्व तमाशा पाहत राहिली. हा व्हिडिओ पाहून आता नेटकरी संतप्त झाले असून महिलेवर कारवाईची मागणी करत आहेत.

नेता छोटा कटआऊट मोठा! AAP आमदाराचा मुलगा आहे म्हणत दुचाकीस्वाराने पोलिसांना दिली धमकी, मग पुढे जे घडलं… Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पिटबूल त्याच्या मालकाच्या उपस्थितीत भटक्या कुत्र्याला क्रूरपणेओरबाडत आहे आणि महिला त्याला रोखण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीये. ज्या भटक्या कुत्र्यावर हल्ला झाला, ती आई आपल्या पिल्लांना दूध पाजणारी असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, तेथून जाणारा एक व्यक्ती पिटबुलला दगड मारून हा सर्व प्रकार रोखण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुत्र्याचा मालकीण मागे वळून त्याच्यावर रागावतो आणि त्याला असे करण्यापासुन रोखते. हा सर्व प्रकार पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले असून यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहेत.

मोडेल पण वाकणार नाही! जंगलाच्या राजाशी वाघाने घेतला पंगा, मृत्यूच्या या खेळात कोण कोणावर पडलं भारी? लढतीचा Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @streetdogsofbombay नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, याआधीही अनेक पिटबुल मालकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या महिलेला काही राजकारण्यांचे पाठबळ आहे, त्यामुळे तिच्यावर कारवाई होत नसल्याचा दावाही करण्यात आला.

दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर हा हल्ला माणसाच्या मुलावर केला असता तर?, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया कुत्र्याला तिच्या ताब्यातून घ्या आणि तिला तात्काळ तुरुंगात टाका”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती हे कसे पाहू शकते. किती असंवेदनशील बाई आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shocking video went viral online sparks horrifying video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
1

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral
2

काळजाचा थरकाप! नवजात मुलाला आई-वडिलांना दगडांमध्ये जिवंत गाढलं, लोकांनी रडण्याचा आवाज ऐकताच बाहेर काढलं अन्… Video Viral

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral
3

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.