धक्कादायक! मुंबई लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण, Video Viral
सोशल मीडियावर अनेक अजब-गजब प्रकार व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी लोकांना हसवतात, कधी रडवतात तर कधी अचंबित करून जातात. सध्या मात्र सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकलमधील आहे, यातील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. लोकलचे बरेच व्हिडिओ तुम्ही याआधी पाहिले असतील मात्र हा व्हिडिओ तुमच्या कल्पनेपलीकडचा आहे.व्हिडिओत नक्की असे काय आहे? चला जाणून घेऊयात.
मुंबई लोकलमधील आणखीन एका धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एक व्यक्ती चक्क नग्नावस्थेत महिला डब्यात चढल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना घाटकोपर स्थानकावर घडून आली. घाटकोपर स्थानकावर हा व्यक्ती निवस्त्र अवस्थेत महिलांच्या डब्यात चढला. यानंतर काय झाले असावे याचा तुम्ही विचार करू शकता. घटनेचा व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला असून आता तो सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेशी आहेत.
काय आहे प्रकरण?
तर घडले असे की, सोमवारी, 16 डिसेंबर 2024 रोजी चार वाजताच्या सुमारास कल्याण एसी लोकल, घाटकोपर स्थानकावर आली. यावेळी एक मनोरुग्ण काहीही कपडे न घालता अक्षरशः नग्नावस्थेत महिलांच्या डब्यात चढला. हे सर्व दृश्य पाहून सर्व महिला हादरल्या आणि त्यांनी एकच गोंधळ घालायला सुरवात केली. व्यक्तीला असे पाहून सर्व महिला आरडाओरड करू लागल्या. यानंतर प्रसंगावधान दाखवत मोटर मनने त्वरित लोकल थांबवली आणि बाजूच्या डब्यात असलेल्या टीसीने या मनोरुग्णाला डब्याबाहेर काढले.
Mumbai Local Viral Video, naked man in mumbai local train pic.twitter.com/kjTGnnCkyd
— Chinmay jagtap (@Chinmayjagtap18) December 17, 2024
सध्या या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ @Chinmayjagtap18 नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर केला गेला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विचार करा जर वेळीच टीसी या ठिकाणी आला नसता तर हा मोठा अनर्थ टाळणे कदाचित शक्य झाले नसते. याआधीही मुंबई लोकलमधील असे अनेक प्रकार व्हायरल व्हिडिओतून उघडकीस आले आहेत. यावर प्रशासनाने वेळीच कठोर पाऊले उचलणे महत्त्वाचे ठरेल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.