Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local case: महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? नायगावच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Mumbai Local case: मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी नायगाव रेल्वे स्थानकाजवळ छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलण्यात आले. या घटनेत तरुणीला डावा हात गमवावा लागला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2026 | 12:54 PM
महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? नायगावच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? नायगावच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी
  • लोकलमधील सुरक्षेसाठी महिलांच्या रेल्वे प्रशासनाकडे मागण्या
निलेश महाडीक, नालासोपारा : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल (Mumbai Local) रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या हजारो महिला प्रवाशांचाही समावेश आहे. मात्र, लोकलमधील छेडछाड, मारहाण आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नायगाव रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर महिला प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.(Mumbai Local case)

छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलले

४ नोव्हेंबर रोजी नायगाव रेल्वे स्थानकाजवळ एका २० वर्षीय तरुणीला छेडछाडीला विरोध केल्यामुळे चालत्या लोकलमधून खाली ढकलण्यात आले. या दुर्दैवी घटनेत तरुणीला आपला डावा हात गमवावा लागला. एका तरुणीच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असतानाही अशा घटना घडत असतील, तर या सुरक्षा यंत्रणेचा नेमका उपयोग काय, असा सवाल महिला प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, आरोपी दोन दिवस मोकाट फिरत असल्याच्या मुद्द्यावरूनही सुरक्षा आणि तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

महिला डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी

मुंबई लोकलच्या १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये महिलांसाठी केवळ ४ ते ५ डबे उपलब्ध असतात. दररोज मोठ्या संख्येने महिला प्रवास करत असल्याने महिला डब्यांमध्ये गर्दी होते. अशा परिस्थितीत महिला प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळण्यासाठी महिला डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

महिला प्रवाशांच्या रेल्वे प्रशासनाकडे प्रमुख मागण्या

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
– पीडित तरुणीला आर्थिक मदत: रेल्वे प्रशासनाने पीडित तरुणीच्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी आर्थिक मदत करावी.
– प्लॅटफॉर्मवर सुरक्षा: प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस किंवा होमगार्ड तैनात करावेत.
– महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक: प्रत्येक महिला डब्यात सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी.
– सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी: रेल्वे स्थानकांसह संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वाढवून त्यांचे नियमित निरीक्षण करावे.
– महिला डब्यांची संख्या वाढवावी: प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन लोकलमधील महिला डब्यांची संख्या वाढवावी.

महिला सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

महिलांना दररोज कामासाठी, शिक्षणासाठी आणि अन्य कारणांसाठी लोकलने प्रवास करावा लागतो. मात्र, प्रवासादरम्यान सुरक्षिततेची चिंता कायम असेल, तर महिला सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

नायगाव येथील घटनेने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. महिला प्रवाशांना निर्भयपणे प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी, प्रत्येक महिला डब्यात सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी आणि गर्दीच्या स्थानकांवर पोलिसांची उपस्थिती वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Megablock: कसारा मार्गावरील प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा १३ आणि १४ नोव्हेंबरला मध्यरात्री विशेष ब्लॉक

💡

Frequently Asked Questions

  • Que: नायगाव रेल्वे स्थानकाजवळ नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: ४ नोव्हेंबर रोजी छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलण्यात आले. या घटनेत तिला डावा हात गमवावा लागला.

  • Que: लोकलमधील महिला प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलीस किंवा होमगार्ड तैनात करणे, महिला डब्यांमध्ये सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे आणि महिला डब्यांची संख्या वाढवणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

  • Que: लोकलमधील महिला डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी का होत आहे?

    Ans: १५ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी केवळ ४ ते ५ डबे उपलब्ध असतात. दररोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेता महिला डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.

Web Title: Naigaon local train women safety security measures demand nalasopara sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Accident
  • Mumbai Local
  • railway
  • Train

संबंधित बातम्या

Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!
1

Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप
2

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
3

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Train Accident: मोठा अपघात! आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेस रुळावरून घसरली, अनेक प्रवास जखमी
4

Train Accident: मोठा अपघात! आसाममध्ये कोलकाता-सैरंग एक्सप्रेस रुळावरून घसरली, अनेक प्रवास जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.