Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naigaon Railway Station: लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक

Naigaon Railway Station: नायगाव रेल्वे स्थानकात ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेत छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत तरुणीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन तिला हात गमवावा लागला. याप्रकरणी ५३ वर्षीय जितेंद्र हिरमुखे याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 05:40 PM
लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; जितेंद्र हिरमुखे पोलिसांच्या ताब्यात

लोकलमधील वाद जीवावर बेतला! छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलले; जितेंद्र हिरमुखे पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • नायगाव रेल्वे स्थानकातील घटनेचा उलगडा
  • छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले
  • आरोपी जितेंद्र हिरमुखे अटकेत
निलेश महाडीक, नायगाव: मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नायगाव रेल्वे स्थानकात छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तिला हात गमवावा लागला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी ५३ वर्षीय जितेंद्र हिरमुखे याला अटक केली आहे. (Naigaon Railway Station)

४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साधारण ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास नायगाव रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. गर्दीच्या वेळेत डब्यांच्या रचनेबाबत झालेल्या गोंधळामुळे २० वर्षीय तरुणी चुकून दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढली होती. हा डबा महिलांच्या डब्याला लागून असल्याने तिचा गोंधळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

E20 पेट्रोलच्या गुणवत्तेवर बीपीसीएलचे स्पष्टीकरण; 893 नमुन्यांमध्ये इथेनॉलचे प्रमाण योग्य

वादानंतर तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलल्याचा आरोप

या डब्यात असलेल्या जितेंद्र हिरमुखे याच्यासोबत तरुणीचा वाद झाला. छेडछाडीला विरोध केल्यानंतर हा वाद वाढला आणि आरोपीने तिला चालत्या लोकलमधून खाली ढकलल्याचा आरोप आहे. यामध्ये तरुणी ट्रेनच्या दोन डब्यांच्या मधून खाली पडली. या अपघातात तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि तिला हात गमवावा लागला. या घटनेनंतर रेल्वे पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले. जखमी तरुणीला बाहेर काढून उपचारासाठी वसई रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला ती बेशुद्ध असल्याने पोलिसांनी तिच्या उपचारांना प्राधान्य दिले.

सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या जबाबातून आरोपीचा शोध

घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. ६ नोव्हेंबर रोजी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तपासाला वेग आला. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र हिरमुखे याला अटक केली. या प्रकरणी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, १०९, ११७(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, वैद्यकीय अहवाल आणि तरुणीच्या गंभीर दुखापतीची माहिती समोर आल्यानंतर गुन्ह्यात आणखी कठोर कलमांची वाढ करण्यात आली. यामध्ये कलम १०९(१) चा समावेश करण्यात आला असून, तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न

या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी, यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. वसई विभागाच्या रेल्वे पोलिसांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. यावेळी एसीपी मनीषा रावखंडे यांनी तपासासंदर्भातील माहिती मांडली.

रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकांवर पुरेसे पोलीस मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची बाबही रेल्वे पोलिसांनी मान्य केली आहे. अनेक प्लॅटफॉर्म आणि महिला डब्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मर्यादित कर्मचाऱ्यांवर असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नायगावमधील या घटनेमुळे लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गर्दीच्या वेळेत पुरेसे पोलीस कर्मचारी तैनात करणे, महिला डब्यांजवळ गस्त वाढवणे आणि स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी समन्वयाने उपाययोजना करण्याचे आव्हान आता उभे राहिले आहे.

Mumbai Youth Festival : मुंबईत 25 नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव; युवक-युवतींना कलागुण दाखवण्याची संधी

💡

Frequently Asked Questions

  • Que: नायगाव रेल्वे स्थानकात तरुणीसोबत नेमकी काय घटना घडली?

    Ans: ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी गर्दीच्या वेळेत झालेल्या वादातून एका २० वर्षीय तरुणीला चालत्या लोकलमधून ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत तिच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

  • Que: या प्रकरणातील आरोपी कोण आहे?

    Ans: या प्रकरणात जितेंद्र हिरमुखे (वय ५३) याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: आरोपीविरोधात कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, १०९, ११७(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासादरम्यान कलम १०९(१) चा समावेश करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Naigaon railway station woman pushed from local train accused arrested sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • Naigaon
  • railway
  • woman

संबंधित बातम्या

Mumbai Local case: महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? नायगावच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
1

Mumbai Local case: महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित कधी होणार? नायगावच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!
2

Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप
3

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
4

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.