Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naigaon Railway Station: छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!

Naigaon Railway Station: नायगाव रेल्वे स्थानकात छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकलखाली ढकलल्याची धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून गमवावा लागला. आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 05:45 PM
छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!

छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला लोकलखाली ढकलले; डावा हात गमावला, नायगाव स्थानकावरील सुरक्षा रामभरोसे!

Follow Us
Follow Us:
  • नायगाव रेल्वे स्थानकात तरुणीला लोकलखाली ढकलल्याची घटना
  • अपघातानंतरही सुरक्षा रक्षक तैनात नाहीत
  • रेल्वे प्रशासनाला सुरक्षेचा विसर?
निलेश महाडीक, नायगाव: वसई-विरार परिसरातील नायगाव रेल्वे स्थानकात छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकल ट्रेनखाली ढकलल्याची धक्कादायक घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती. या घटनेत तरुणीचा डावा हात कोपरापासून गमवावा लागला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असली, तरी नायगाव रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे. घटनेनंतरही स्थानकावर एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचा आरोप होत आहे. (Naigaon Railway Station)

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणारी लोकल नायगाव रेल्वे स्थानकात आली असताना आरोपीने तिच्या छातीजवळ हात लावून गैरवर्तन केले. तरुणीने याला विरोध करत आरोपीला चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. लोकल फलाटावर थांबलेली असताना आरोपीने तरुणीला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून थेट रेल्वे रुळांवर पडली.

तरुणी फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाली. यावेळी तिचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा हात कोपरापासून कापावा लागला. या घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला होता.

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

आरोपीला अटक; कुटुंबीयांची कलमे वाढवण्याची मागणी

या प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११७(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, आरोपीने तरुणीला लोकलखाली ढकलल्याने खुनाच्या प्रयत्नाचे कलम १०९ लावण्यात यावे, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.

या मागणीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणात आवश्यक कलमे वाढवण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दुर्घटनेनंतरही सुरक्षा यंत्रणा सुस्त?

या घटनेनंतर नायगाव रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एवढी गंभीर घटना घडूनही स्थानकावर सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचे दिसून येत असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एका तरुणीला छेडछाडीला विरोध केल्याची मोठी किंमत मोजावी लागल्यानंतरही नायगाव स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था सुधारलेली नसेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Mumbai News ; मुंबईत भोजपुरी गाण्यांचा वाद पेटला! भोजपुरी गाणी वाजवण्यामागचं कारण काय? रेल्वेचं अजब स्पष्टीकरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: नायगाव रेल्वे स्थानकात तरुणीला लोकलखाली कधी ढकलण्यात आले?

    Ans: ४ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: या घटनेत तरुणीला कोणती दुखापत झाली?

    Ans: लोकल सुरू झाल्याने तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आला. त्यामुळे तिचा हात कोपरापासून कापावा लागला.

  • Que: या प्रकरणातील आरोपीचे नाव काय असून त्याच्यावर काय कारवाई झाली?

    Ans: या प्रकरणातील आरोपी जितेंद्र हिरमुखे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Naigaon railway station woman pushed under local train assault security concerns sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • railway
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप
1

Central Railway Controversy: महाराष्ट्रात मराठी गाण्यांऐवजी भोजपुरी गाणी का? मध्य रेल्वेच्या निर्णयावर मराठी संघटनांचा संताप

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
2

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL
3

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये जीवघेणा राडा! मारामारी करताना तरुणाचा तोल गेला अन्…; थरारक घटनेचा VIDEO VIRAL

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! 2 दिवसांत 25 ते 30 आगीच्या घटना; पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप
4

Vasai Virar Diwali Fire : दिवाळीत वसई-विरारमध्ये अग्नितांडव! 2 दिवसांत 25 ते 30 आगीच्या घटना; पालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.