shocking viral video of snake found in home fridge video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर कधी असे धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे पाहून अंगाचा थरकाप उडतो. सध्या असाच एक भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने पाणी पिण्यासाठी फ्रीज उघडला आहे. पण त्यानंतर तिला जे दिसले यामुळे तिच्या तोंडचे पाणीच उडाले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिलेने फ्रीज उघडला आहे. फ्रीज उघडल्यावर बघते तर काय फ्रीजमध्ये भलामोठा साप, हे पाहून तिच्या तोडंचे पाणीच पळाले आहे. फ्रीज उघडल्यावर तुम्ही पाहू शकता की, फ्रीजमध्ये साप दिसत आहे. पाण्याचत्या बॉटल ठेवण्याच्या कप्प्यात एक साप फणा काढून बसलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण घराच्या फ्रिजमध्ये भलामोठा साप दिसणे धक्कादायक आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. महिलेने हा प्रसंग लगेच कॅमेरात कैद केला आहे. मात्र फ्रिजमध्ये साप कसा आणि कधी पोहोचला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kashikyatra या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, कसे शक्य आहे हे? , तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सापाला देखील गरम होत असले. तर काहींनी साप खोटा असल्याचे म्हटले आहे. काही लोकांनी हैराण झाल्याचे इमोजी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.