sikkim teacher dance with students on thumak-thumak video goes viral
सोशल मीडियावर सतत काही ना काही नव्या गोष्टी ट्रेंड होत असतात. कधी कोणते जुगाडाचे व्हिडिओ, तर कधी भन्नाट भन्नाट गाणी सतत ट्रेंड होत असतात. या गाण्यांवर सामान्यांपासून ते सिलेब्रिटीपर्यंत, तौबा-तौबा, लापरी, शेकी-शेकी, कतल-कतल, गुलाबी साडी, काळी बिंदी काळी कुर्ती, यांसारखी गाणी गेल्या काही काळात सोशल मीडियावर ट्रेंड झाली आहे. सध्या असेच एक पंजाबी गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यावर सिक्कमच्या शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत डान्स केला आहे. यामध्ये सर्व मुले असून सर्वांनी गोंडस असा डान्स केला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षिका ठुमक-ठुमक गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत डान्स करत आहे. सुरुवातीलच्या गाण्याच्या बोलांवर शिक्षिका छान असे एक्सप्रेशम देत डान्स करत आणि नंतर ठुमक-ठुमक वर थिरकत बाजूला जाते. तिच्या पाठोपाठ तिचे विद्यार्थी देखील ठुमक-ठुमक वर छान कंबर हालवत डोक्यावर हात ठेवनू डान्स करतात. पाच-सहा विद्यार्थ्यांसोबत शिक्षिकेने डान्स केला आहे. सध्या हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की, सोशल मीडिया क्रॅश होईल. हा व्हिडिओ अतिश गोंडस आहे, हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील प्रेमात पडाला आणि या गाण्यावर थिरकायला लागाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येईल.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम @karmadoma_15 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘My Pookies’ असे लिहिले आहे. व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी ठुमक-ठुमक गाण्याची क्वीन म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत शेअर केला आहे. तसेच तुम्हीही कदाचित या गाण्यावर व्हिडिओ बनवला असेल. हा व्हिडिओ हजारो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.