(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात पण आता मात्र इथे शिकारीचा एक अनोखा थरार दिसून आला आहे ज्यात पाण्याचा थरारक शिकारी मगरीने एका कासवाची शिकार केल्याचे दृश्य दिसून आले. कासव हा सामान्य आणि लहान प्राणी असला तरी त्याचे कवच त्याच्या संरक्षणाचे काम करत असते. याच्या मदतीने कासव शिकाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करत असतो. पण आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मात्र मगर कवचासकट कासवाला खाताना दिसून आला. मगरीने अक्षरशः कासवाला तोंडात घेत त्याचे कवच चावून चावून त्याला खाण्याचा प्रयत्न केला. कासवाची ही शिकार अनेकांना थक्क करणारी ठरली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, एका तळ्यात मगर आपल्या भक्ष्याचा आनंद घेत आहे. तिच्या तोंडात तिने कासवाला पकडले असून कासवाचे कवच मजबूत असल्याचे तिला त्याला खाण्यात समस्या येत असल्याचे यात दिसून येते. पण मुख्य म्हणजे मगर तरीही कासवाला सोडत नाही आणि चावून चावून त्याला खाण्याचा प्रयत्न ती करू लागते. हा व्हिडिओ आपल्याला निसर्गाच्या कठोर बाजूची जाणीव करून देतो, जिथे प्रत्येक प्राणी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो. कासवावर हल्ला करणारा मगर जरी दुःखद असला तरी तो परिसंस्थेचा एक भाग आहे. असे व्हिडिओ आपल्याला प्रत्येक प्रजातीचे स्वतःचे स्थान आणि भूमिका कशी असते याबद्दल विचार करायला लावतात.
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 12, 2025
शिकारीचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्या कासवाला मदत करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिथे उभे राहून चित्रीकरण करणे हे वाईट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते क्रूर आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मगर क्रूर शिकारी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.