Sunita Williams Latest Video Sunita Williams returned to Earth after 9 months; pet dog showered her with love video
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यानंतर सुखरुप पृथ्वीवर परतले. त्यानंतर दोन्ही अंतराळवीरांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आहे. अंतराळात दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांच्या स्नांयूममध्ये कमकुवतपणा, हाडांची झिज, झाली होती. याशिवाय त्यांना इतर कोणता त्रास होऊ नये यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सुनीता विल्यम्स आपल्या घरी परतल्या. यावेळी त्यांना पाहून त्यांच्या पाळीव श्वानांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेमाचा वर्षाव केला. सुनीता विल्यम्स यांनी या भावुक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनीता विल्यम्स घराच्या दरवाज्यात पोहतात यावेळी त्यांचे पाळीव श्वान लॅबरॉडॉर गनर आणि गोर्बी त्यांच्याकडे धावत येतात. सुनीता विल्यम्सला पाहून त्यांना अत्यंत आनंद होतो. आनंदात दोन्ही श्वान सुनीता विल्यम्सच्या आवतीभोवती उड्या मारु लागतात, त्यांना प्रेमाने चाटू लागातात. दरम्यान या भावूक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुनीता विल्यम्स देखील दोन्ही श्वानांवर प्रेम करत आहेत.
दरम्यान सुनीता विल्यम्स यांनी टेक्सासच्या एका पत्रकार परिषदेत आपल्या 9 महिन्यांचा अनुभव शेअर केला. त्यांनी म्हटले की, अंतराळातून सुखरुप परत आणल्याबद्दल सुनीता नासा, स्पेसएक्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेत दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळात घालवलेल्या नऊ महिन्यांचा अनुभव शेअर केला. सुनीता विल्यम्स यांनी म्हटले की, पृथ्वीवर परत आल्याचा अनुभव अत्यंत सुखद आहे. आता त्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे आणि नव्या आव्हानांसाठी सज्ज आहेत. त्यांनी आम्ही पुन्हा उड्डाण भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अंतराळातून भारताकडे पाहाताना विलक्षण असे दृश्य अनुभवायला मिळाले असेही म्हटले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Best homecoming ever! pic.twitter.com/h1ogPh5WMR
— Sunita Williams (@Astro_Suni) April 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ स्वत: सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Astro_Suni या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लोखा लाई्क्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस पडत आहे. सुनीता विल्यम्स लवतरच भारतात येणार आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी किती छान, किती गोंडस असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.