धोतरवाल्या आजोबांचा नादच खुळा! क्रिकेटच्या मैदानात चेंडू टोलवून घेतली अशी धाव; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
खरंतरं क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ आहे. पण आपल्या भारतात क्रिकेटला मोठा दर्जा दिला जातो. अगदी प्रत्येक वयोगटातील लोक आवडीने क्रिकेट खेळतात. देशातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचा क्रिकेट खेळताना उत्साह ओसांडून वाहत असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरुषांपासून महिलांपर्यंत सर्वांनाच क्रिकेट हा खूप आवडतो. गावी गल्लोबोळात तर शहरात मोठमोठ्या मैदानावर अनेकजण क्रिकेट खेळताना दिसतील. अनेक क्रिकेटप्रेमींच्या यशाच्या चर्चा देखील तुम्ही ऐकल्या असतील.
सोशल मीडियावर तर असे अनेक क्रिकेट खेळणाऱ्यांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतील. कोणी त्यांच्या आवडत्या क्रिकेटर धोनी सारखा हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसतो, तर कोणी बुमराह सारखा बॉलिंग करताना दिसतो. सध्या एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक आजोबा क्रिकेट खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ते धोतर घालून अगदी तरुणाप्रमाणे क्रिकेट खेळत आहेत. क्रिकेटच्या मैदानात धाव घेत आहेत. त्यांच्या क्रिकेटचा वेगळाच अंदाज पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. आजोबांची बॅटिंग आणि त्यांचा जोश पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हा पाहू शकता की, गावाकडे काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहेत. इथेच एक आजोबा बॅटिंग करताना दिसत आहे. आजोबांचा उत्साह अगदी ओसांडून वाहत आहे. अगदी जल्लोषात ते क्रिकेट खेळत आहेत. चेंडूला हिट केल्यावर रन घेण्यासाठी आजोबा अशा धाव घेत आहे की, पाहून चाहते शेवटच्या षटकातील धोनी असे म्हणत आहे. त्यांच्या खेळ पाहून इतर मुलेही हसत आहेत. आजोबांनी आपली एक वेगळीच स्टाईल मुलांना दाखवून दिली आहे. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Dhoni bhai last over mein jab 75 runs chahiye ho #CSKvsRCB pic.twitter.com/gueEvR8R0r
— Raja Babu (@GaurangBhardwa1) March 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @GaurangBhardwa1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. लाखो लाईक्स आणि व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आजोबांनी मैदान गाजवलं, तर दुसऱ्या एकाने आजोबांची बॅटिंग पाहून विराटलाही लाज वाटेल असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने धोतर असो किंवा जर्सी क्रिकेटप्रेमी असणे महत्वाचे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.