
‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, आपल्याला बाहेरुन पंडाल पूर्णपणे कोर्टच्या रुपात सजवण्यात आले आहे. भगवान श्री गणेश न्यायमूर्तींच्या वेशात सजलेले आहेत. खुर्चीवर न्यायमूर्तींच्या वेशात गणेशाची ही मूर्ती आपण क्वचितच कधी पाहिली असावी. त्यांच्या एका हातात न्यायाधीशांचा हातोडा आणि दुसऱ्या हातात न्यायाची तराजू आहे. मुख्य म्हणजे, मंडपात वकील, पोलीस आणि साक्षीदारांच्या पिंजऱ्याची संपूर्ण मांडणीही करण्यात आली होती. इतकंच नाही तर बॅग्राउंडमध्ये ‘यतो धर्मस्ततो जयः’ हा जप आणि न्यायाशी संबंधित श्लोक लिहिलेले होते. गणेशाच्या शेजारी मूषकराजही उभा असतो. माहितीनुसार, पर्यावरणपूरक साहित्यापासून गणेशाच्या या पंडालाला तयार करण्यात आले होते. इंटरनेटवर हे अनोखे पंडाल चांगलेच ट्रेंडमध्ये असून भाविक मोठ्या गर्दीने ‘न्याय गणपती’चे दर्शन घेण्यासाठी ठिकाणाला भेट देत आहेत.
#WATCH | Eco-friendly ‘Nyayamurti Ganapathi’ with a Supreme Court-themed pandal attracts devotees in Warangal, Telangana. A unique blend of faith and creativity, with a message of environmental awareness. pic.twitter.com/MdjVLNPTpw — ANI (@ANI) September 20, 2026
Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
या अनोख्या गणेश पंडालाचा व्हिडिओ @ANI ने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला. व्हिडिओला आतापर्यंत 23.5 हजार व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “देवाची अशी अवहेलना करु नका”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाप्पा बोलेल अरे मला आहे तसं राहू द्या”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण गणपतीसोबत हे सर्व प्रयोग करायलाच हवेत का? तो साध्या रुपातच शोभून दिसतो”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.