
‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही रविवारी ५.४५ ते ६.३० वाजताच्या सुमारास घडली. उपनिरीक्षक व्ही. विग्नेश आणि हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन यांचा समावेश असलेले एक पथक विलांकुरिची आणि कलापट्टी दरम्यान वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान बंगळूरहून येणाऱ्या एका संशयास्पद कारला रस्त्यातच थांबवण्यात आले. पोलिस गाडीची झडती घेत असताना आरोपींना त्यांना दूर ढकलले आणि गाडी सुरु करत ते फरार झाले. यावेळी आरोपींना पकडण्यासाठी कॉन्स्टेबल वेलमुरुगन यांनी गाडीवर चढून आरोपींचा पाठलाग करण्याचा निर्धार बनवला. रस्त्यावर सुरु असलेला हा थरार इतर चालकांनी पाहिला आणि त्यांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली.
🚨 COP RIDES ON TOP OF MOVING CAR DURING 40-KM CHASE IN COIMBATORE Kovilpalayam Police chased a car for nearly 40 km after receiving information about suspected smugglers travelling through the Vilankurichi area. During the pursuit, a policeman reportedly climbed onto the roof… pic.twitter.com/ecVxLbPS5L — contentkikamii (@contentkikamii) September 27, 2026
सुमारे ३० किलोमीटरपर्यंत सुरु असलेला हा थरार तिरुप्पूर सीमेजवळील थेक्कलूर येथे संपला. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या अन्य गाड्यांनी आरोपीच्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलिस आणि रुग्णवाहिका चालकांनी कारला चारही बाजूंनी घेरले ज्यानंतर आरोपींनी आत्मसमर्पण केले. पळण्याचा प्रयत्न करत असताना दोन आरोपींच्या हाताला फ्रॅक्चर झाला. पोलिसांनी तब्बल १७० किलोग्रॅमचा माल गाडीतून जप्त केला असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.