Teerific Accident on Railway Crossing of car video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये अपघाताचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ तर इतके भयावह असतात, की पाहून अंगावर काटा येतो. अनेकदा हे अपघात लोकांच्या निष्कारळजीपणामुळे घडतात. वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे, हेल्मेट न घालणे, वेगाने गाडी चालवणे या सर्व कारणांमुळे अपघातात घडातात. अनेकदा लोकांना अति घाई देखील नडते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक वाहन चालकाने रेल्वे फाटक बंद होत असल्यामुळे पटरी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. परंतु यामुळे त्याच्या व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. व्हॅनचे तुकडे तुकडे झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TaraBull808 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा अपघात पोलंडमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता की, रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली आहे. या ठिकाणी एक व्हॅन ड्रायव्हर गाडी घेऊन येत आहे. याच वेळी ट्रेन येत असल्याने रेल्वे क्रॉसिंगचे फाटक बंद होण्यास सुरुवात होते. मात्र व्हॅन चालक याकडे दुर्लक्ष करतो आणि व्हॅन रेल्वे क्रॉसिंगवर नेतो. परंतु अचानक दोन्ही बाजूंनी फाटक बंद झाल्याने मध्येच अडकतो. चालक गाडी थोडी बाजूल करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आसपास कोणताचा ऑप्शन नसतो. याच वेळी एका बाजूने एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने येत असते. ट्रेन व्हॅनला धडक देऊन पुढे निघून जाते. व्हॅनचे मात्र तुकडे-तुकडे होतात आणि हवेत उडतात.
30 सेकंदाची रिल जीवापेक्षा किमती? तरुण धावत्या ट्रेनसमोर गेला अन्….; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL
Van driver runs the red light and gets hit by a train pic.twitter.com/n3223QyuzJ
— TaraBull (@TaraBull808) August 6, 2025
हा अपघात इतका भयंकर होता की पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. शिवाय ट्रेनची धडक इतकी जोरात बसलेली आहे की, व्हॅन चालक सुरक्षित आहे का नाही याची पुष्ट झालेली नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी व्हॅन चालकावर टीका केली आहे. त्याच्या चुकीमुळे त्याने मृत्यूला आव्हान दिले असल्याचे म्हटले आहे. पण या असा व्हिडिओवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, वाहतूकीच्या नियमांचे पालन किती महत्वाचे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.