अलीकडे लोकांवर रिल बनवण्याचे भूत सवार झाले आहे. लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूज साठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. लोकांना स्वत:च्या जीवाची कसलीही पर्वा उरलेली नाही. रोज कोणी ना कोणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. या स्टंटबाजीमुळे आतापर्यंत अनेकांचा गंभीर अपघात झाला आहे, मात्र तरीही लोक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. विशेष करुन यामध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कोणी धोकादायक बाईक स्टंट करत आहे, तर कोणी धावत्या रेल्वेसमोर रिल बनवण्यास, फोटो काढण्याचा स्टंट करत आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत पाहायला मिळत आहे.
आता नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण रिल बनवण्यासाठी धावत्या ट्रेनसमोर गेला आहे. परंतु धावत्या ट्रेनसमोर रिल बनवणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने पटरीवरुन धावत आहे. याच वेळी एक तरुण धावत्या ट्रेनच्याबाजूने हिरो स्टाईलमध्ये चालत रिल बनवत आहे. परंतु तरुणाचा अंदाज चुकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तरुणाला पटीरीपासून किती लांबून चालायाचे याचा अंदाज येत नाही. यामुळे ट्रेन येताचा त्याच्या डोक्याला धडकते आणि तरुण बाजूला उडून पडतो. तरुणाला उठताही येत नसते. व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, तरुणाच्या डोक्याला चांगलाच मार बसला आहे.
बच गया रील पुत्र 😱😱😱 pic.twitter.com/A6aF4ekcOG
— Zoya Shamim Khan 🎀 (@ZoyaShamimKhan) August 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ZoyaShamimKhan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाला असा मुर्खपणा कोणी करायला लावला होता असे म्हटले आहे. याच वेळी एका युजरने व्हिडिओ बघणाऱ्या आणि लाईक करणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, जर अशा रिल्स कोणी लाईक केल्या नाही, पाहिल्या नाहीत शेअर केल्या नाहीत तर असे व्हिडिओ बनवले देखील जाणार नाहीत. यामुळे त्या तरुणाची जेवढी चूक आहे, तेवढीच व्हिडिओ पाहणाऱ्यांचीही आहे. सध्या व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही.
त्यानं पॅंट काढली अन्…! भर रस्त्यात तरुणाचे मुलीला अश्लील इशारे; VIDEO पाहून होईल संताप अनावर
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.