जंगलाच्या शिकाऱ्याने पाण्यात जाऊन केली मगरीची शिकार; संपूर्ण शरीर फाडून काढलं अन् दृश्य पाहून तुमचाही उडेल थरकाप
जंगलातील आयुष्य माणसांच्या आयुष्याहुन बरेच वेगळे असते. इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचा मृत्यू होणे हे अटळ सत्य आहे. जंगलात फार आधीपासून मोठे बलाढ्य शिकारी राज्य करत आले आहेत आणि संपूर्ण जंगलात फक्त त्यांचीच दहशत पाहायला मिळते. जंगलातील शिकारीचे अनेक व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात मात्र तुम्ही कधी शिकाऱ्याचीच शिकार झाल्याचे दृश्य कधी पहिले आहे का? वास्तविक, हा चमत्कार नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये घडून आल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओत एका बिबट्याने मगरीची शिकार केल्याचे दिसून आले आणि तेही इतक्या चपळतेने की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
जंगलातील सर्वात चपळ आणि वेगवान शिकाऱ्यांमध्ये बिबट्याची लोकप्रियता दूरदूरवर पसरलेली आहे तर पाण्याचा राक्षस म्हणून मगरीची ओळख आहे. अशात हे दोन्ही शिकारी जेव्हा एकमेकांना भिडतात एक अद्भुत दृश्य दिसून येते. व्हायरल व्हिडिओमध्ये, बिबट्याने झाडावर बसून मगरीची शिकार करण्याचा प्लॅन आखला आणि त्याला यशस्वीही केले. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात बिबट्या झाडावर बसून पाण्यात पोहत असलेल्या मगरीला निशाणा बनवतो आणि वेळ पाहून थेट पाण्यात उडी घेतो. मगरीला काही समजेल याआधीच तो तिची शिकार करण्यास सुरुवात करतो आणि अवघ्या काही सेकंदातच तिचा फडशा पाडतो. व्हिडिओमध्ये पाण्यात एक बोट देखील दिसत आहे ज्यात बसलेली काही माणसं दुरूनच शिकारीचा हा थरार पाहतात आणि आपल्या कॅमेरात हे दृश्य कैद करू लागतात. दरम्यान शिकारीचा हा थरार आता सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून लोक हे दृश्य वेगाने शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याने ते इतक्या लवकर खाल्ले यावर माझा विश्वासच बसत नाहीये!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक छायाचित्रकार म्हणून मला हे फोटो काढायचे खूप होते.. विश्वातील अद्भुत प्राणी मला खात्री आहे की त्यांनी पौराणिक पोझेस टिपल्या असतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी इथे दुसऱ्या कॅमेरामनच्या दृष्टिकोनातून आलो आहे. या मोठ्या मांजरीला जिंकताना पाहून आनंद झाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.