(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक अजब-गजब गोष्टी व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसून येतील ज्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. अशातच आता इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांचेच डोळे विस्फारून टाकले आहेत. व्हिडिओमध्ये आपल्या एक टॉयलेट दिसून येत आहे मात्र हे काही साधे सुधे टॉयलेट नसून याचा माहौल एकदम क्लब सारखा तयार करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहून तुम्हीही कोड्यात पडाल की, हा क्लब आहे की टॉयलेट… चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये पाहून ज्याने कोणी हे केले तो एक क्लब प्रेमी असावा असा अंदाज लावला जात आहे. डीजे लाइट्स आणि त्यामुळे झालेलं ते रंगीबेरंगी टॉयलेट अनेकांना हसू आणत आहे तर काहींना थक्क करून सोडत आहे. टॉयलेटकडे पाहून याआधी कुणाचेही डोळे इतके खिळून राहिले नसतील जेवढे आता व्हिडिओत पाहून खिळत आहे. व्हिडिओमध्ये व्यक्तीने टॉयलेटमध्येच कलरफुल लाइट्स लावलेले दिसत आहे ज्यामुळे संपूर्ण टॉयलेट रंगून गेलं आहे. यासोबतच तिथे डीजेसारखं गाणं देखील वाजत आहे ज्यामुळे याला पूर्णपणे एका क्लबचा फील येत आहे. युजर्स या टॉयलेटकडे पाहून आता नक्की इथे नाचावं की काय करावं असा मिश्किल प्रश्न देखील उपस्थित करत आहेत. लोक या व्हिडिओची चांगलीच मजा लुटत असून मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला शेअर केले जात आहे.
आई शेवटी आईच असते! पिल्लासाठी वाघाशी लढली अन् जंगलाच्या राजाला असं पळवलं… लढतीचा थरारक Video Viral
दरम्यान या अनोख्या टॉयलेटचा व्हिडिओ @alamin15757 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यात नाचायचं आहे की हागायचं?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाॅशरुम नाही हा तर क्लबरुम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे हे नक्की काय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.