Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईची माया आटली, जन्म दिलेल्या नवजात बाळाला नाकारलं अन् हत्तीचं पिल्लू तब्बल 5 तास रडत राहिलं… हृदयद्रावक Video Viral

Elephant Baby Crying Video : आईचा नकार अन् तब्बल 5 तास रडत राहिलं पिल्लू...! जन्मदात्या आईनेच केला मारण्याचा प्रयत्न, पिल्लाच्या डोळ्यातील अश्रू पाहाल तर तुम्हीही भावुक व्हाल. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2025 | 08:31 AM
आईची माया आटली, जन्म दिलेल्या नवजात बाळाला नाकारलं अन् हत्तीचं पिल्लू तब्बल 5 तास रडत राहिलं... हृदयद्रावक Video Viral

आईची माया आटली, जन्म दिलेल्या नवजात बाळाला नाकारलं अन् हत्तीचं पिल्लू तब्बल 5 तास रडत राहिलं... हृदयद्रावक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जगात आई-मुलाचे नाते सर्वात घट्ट मानले जाते. आईच्या कुशीत मुलाला सुरक्षितता, माया आणि ऊब मिळते. पण कधी कधी निसर्गाच्या विचित्र खेळामुळे हे नाते तुटते आणि त्याचे परिणाम पाहून डोळे पाणावतात. असेच काहीसे एका छोट्या हत्तीच्या पिल्लाबाबत घडले. जन्मानंतर काही तासातच या पिल्लाला त्याच्या आईने नाकारले. सहसा आई हत्ती जन्मानंतर पिल्लावर प्रचंड प्रेम, काळजी व माया दाखवते. परंतु या घटनेत आईने पिल्लाला जवळ घेण्याऐवजी त्याला दूर केले. आईकडून न मिळालेली ऊब आणि मायेची आस पिल्लाला खूप जाणवली.

३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! तरुण धोकादायक धबधब्याच्या काठावर शूट करायला गेला अन्…, थरारक VIDEO VIRAL

आईची साथ न मिळाल्याने ते पिल्लू तासनतास रडत राहिले. त्याच्या डोळ्यातून गळणारे अश्रू पाहून वनाधिकारी व तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी आले. छोट्या जीवाला आपल्या आईची माया हवी होती, पण ती मायेची ऊब त्याला मिळाली नाही. आईने आपल्याला स्वीकारण्यास नाकारले आहे हे जाणवताच तो रडत राहिला. हे दृश्य इतके भावुक करणारे होते की ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याचे हृदय पिळवटून निघाले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,…

माहितीनुसार, ही घटना २०१३ साली एका चिनी प्राणीसंग्रहालयात घडून आली. इथे छोटंसं हत्तीचं पिल्लू जन्माला तर आलं पण मुलाच्या आयुष्यात जन्मापासूनच दुःख लिहिलेले होते. पिल्लाला पाहताच त्याच्या आईने त्याला नाकारले आणि तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जन्मदात्या आईकडूनच अशी वागणूक मिळाल्याने पिल्लाला क्षणातच अश्रू अनावर झाले. तो रडला पण किती, तर सलग पाच तास… त्याचे हे दुःख इतके हृदयद्रावक होते की याचा व्हिडिओ इतक्या वर्षांनी शेअर केल्यानंतरही व्हायरल झाला.

लोकांनी पिल्लाचे दुःख समजून घेतले आणि यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका युजरने लिहिले, “प्राण्यांना भावना असतात याचा हा पुरावा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते पाहणे हृदयद्रावक होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला रडू आलं, मला त्या बाळाला मिठीत घ्यावंस वाटत आहे”. दरम्यान घटनेचा व्हिडिओ @NewsEDKennedy नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: The baby elephant cried for 5 hours after being rejected by its mother heart breaking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,…
1

अरे काय चाललंय तरी काय? धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा आणखी एक VIDEO ; पाहून नेटकरी संतापले म्हणाले,…

३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! तरुण धोकादायक धबधब्याच्या काठावर शूट करायला गेला अन्…, थरारक VIDEO VIRAL
2

३० सेंकदाची रिल जीवावर बेतली! तरुण धोकादायक धबधब्याच्या काठावर शूट करायला गेला अन्…, थरारक VIDEO VIRAL

आधी श्वानाला बेदम मारहाण मग बाईकला बांधून …; अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral
3

आधी श्वानाला बेदम मारहाण मग बाईकला बांधून …; अहमदाबामधील व्यक्तीचे संतापजनक कृत्य, Video Viral

बाईकवर रोमान्स प्रेमी जोडप्याला पडला महागात; पोलिसांनी रोमियो-ज्युलिएटवर ठोठवला भारी-भक्कम दंड, Video Viral
4

बाईकवर रोमान्स प्रेमी जोडप्याला पडला महागात; पोलिसांनी रोमियो-ज्युलिएटवर ठोठवला भारी-भक्कम दंड, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.