दादाच्या कुशीतच झोपणार मी...! पळत पळत चिमुकल्या हत्तीने घेतली केअरटेकरकडे धाव, गेला अन् मांडीवरच जाऊन झोपला; क्युट Video Viral
जंगलातील अनेक सुंदर आणि मनमोहक दृश्य नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातून आपल्याला प्राण्यांच्या जीवनाविषयी आणखीन जवळून जाणून घेता येते. त्यातच आता इंटरनेटवर हत्तीच्या पिल्लाचा एक गोंडस व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात पिल्लाचं त्याच्या केअरटेकरसोबत असलेले गोड नातं अधोरेखित झालं आहे. व्हिडिओत चिमुकला गजराज धावत पळत येतो आणि केअरटेकर दादाच्या कुशीतच जाऊन बिलगतो. हे सुंदर दृश्य सोशल मीडियावर सर्वांनाच आता घायाळ करत असून याचा इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
काय घडलं व्हिडिओत?
हत्ती हे दिसायला विशालकाय शरीराचे असले तरी त्यांचा स्वभाव फार शांत आणि मनमिळावू असतो. ते नेहमीच माणसांशी जुळवून घेतात आणि त्यांच्यासोबत मनमोकळ्यापणाने राहतात. प्रत्येक लहान मुलं जसा गोंडस आणि निरागस स्वाभाचा असतो तसेच प्राण्यांची पिल्लेही क्युट आणि कोमल, मस्तीखोर स्वभावाची असतात. व्हिडिओमध्ये हत्तीच्या पिल्लाचे त्याच्या केअरटेकरसोबत असलेले सुंदर नातं प्रतिबिंबित होत जे पाहायला आणखीनच सुंदर वाटतं. आपण व्हिडिओत पाहू शकता यात एक मुलगा जमिनीवर शांत बसलेला असतो आणि त्याच वेळो तिथे एक चिमुकला हत्ती हळूहळू धावत येतो आणि मुलाला असे बसल्याचे पाहताच तो त्याच्या कुशीत जाऊन बिलगतो. मुलगाही त्याला आपल्या कुशीत घेतो आणि पिल्लू कुशीतच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतो. एखाद बाळ जसं आईच्या कुशीत जाऊन झोपतं अगदी तसंच हे हत्तीचं पिल्लू मुलाच्या कुशीत जाऊन झोपतं, जे पाहून खरखरचं मनाला सुख प्राप्त होत. या सुंदर आणि निरागस दृश्यांनी आता सोशल मीडिया युजर्स चांगलेच सुखावून गेले असून याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवत आहे.
हा गोड व्हायरल व्हिडिओ @unknown_cheeku_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘क्युटीला दादाच्या कुशीतच झोपायचे आहे’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हत्तीचं पिल्लू माझा आवडता प्राणी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दादा तुझ्या कुशीत सुख मिळत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना पण प्रेम हवं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.