(फोटो सौजन्य: X)
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवण्याचा आदेश दिला आहे ज्यानंतर देशभर हा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने अनेक लोक आनंदी झाले आहेत तर काही प्राणीप्रेमी या निर्णयामुळे नाराज झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक बातम्या याआधीही समोर आल्या आहेत आणि पुन्हा आता यासंबंधीचा एक थरारक आणि सर्वांना हादरवून टाकणारा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ३ कुत्र्यांनी एकत्र येऊन एका दीड वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला चढवल्याचे दृश्य दिसून आले आहे. मुख्य म्हणजे ते मुलाला इतक्या निर्दयतेने आणि भयंकर रीतीने ओरबाडून टाकतात की पाहून सर्वांच्याच अंगावर काटा येतो. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून नक्की काय घडलं ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक चिमुकला आपल्या घराबाहेर खेळत असल्याचे दिसते पण याचवेळी तिथे ३ कुत्रे येतात आणि चिमुकल्याला पाहताच ते त्याच्यावर हल्ला चढवतात. कुत्रे त्याला घेरत जमिनीवर लोळवतात आणि खेचत त्याच पूर्ण शरीर ओरबडायला सुरुवात करतात. मुलगा वेदनेने कळवळतो पण तिथे कोणीही नसल्याचे या संधीचा फायदा घेत कुत्रे त्याला सोडायला तयारच होत नाहीत. पुढे सुदैवाने तिथे एका माणसाची एंट्री होते जो हे सर्व पाहून लगेच कुत्र्यांवर हल्ला करतो आणि त्यांच्या तावडीतून चिमुकल्याचा सुटका करतो. मुलाचा आवाज ऐकून व्हिडिओमध्ये पुढे आजूबाजूचे लोक देखील मदतीसाठी मुलाच्या दिशेने धाव घेत असल्याचे दिसते, त्यांना पाहताच कुत्रे घाबरतात आणि लगेच तिथून आपला पळ काढतात. या घटनेत चिमुकल्याचा जीव तर वाचतोच पण त्याला गंभीर दुखापत होते. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यातील थरारक दृश्ये पाहून लोक आता भटक्या कुत्र्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
1.5 yr old kid playing outside house attacked by dogs in Punjab.
“They don’t attack without provocation” pic.twitter.com/tXCEOi6lcs
— JP Chadda🇵🇸🏳️⚧️🏳️🌈🇮🇷 (@JP_Chadda) August 13, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @JP_Chadda नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे उदाहरण आहे की, लहान मुलांना कधीही एकटं बाहेर पाठवू नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलगा वाचला का? आशा आहे की तो ठीक असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.