(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि आपल्याला थक्क करणारे व्हिडिओज नेहमीच शेअर केले जाते. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीडचे ठरतात ज्यामुळे फार कमी वेळेत ते व्हायरल होतात. आताही इथे असेच काहीसे घडून आले आहे. नुकताच भारताचा स्वातंत्र्यदिन पार पडला, या दिनानिमित्तच सोशल मीडियावर एक अद्भुत व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात भारताचा राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्षी हे दोघेही एकत्र दिसून आले. जंगलातील हे दोन सुंदर आणि राष्ट्रीय प्राणी जेव्हा एकत्र आले तेव्हा व्हिडिओची शान एका वेगळ्याच उंचीवर पोहचली. लोकांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला आणि हे दृश्य वेगाने शेअर करायला सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
हा सुंदर व्हिडिओ उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून समोर आला आहे. यामध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आणि राष्ट्रीय पक्षी मोर एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसत आहेत. हे दृश्य इतके अनोखे आहे की प्राणीप्रेमी याला ‘जीवनात एकदाच मिळणारी संधी’ म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कॉर्बेटच्या जंगलात एक वाघ शांतपणे मोराच्या मागे जात आहे. दोघेही एकाच मार्गावर आहेत, परंतु वातावरणात कोणतीही भीती किंवा चेंगराचेंगरी नाही. उलट, दोघेही फार शांत आणि निवांत दिसून येत आहेत. हे दृश्य एखाद्या परीकथेसारखे वाटते, ज्यामध्ये जंगलाचे दोन सुंदर आणि अभिमानास्पद प्रतीक एकत्र दिसतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक केवळ आनंदी होत नाहीत तर निसर्ग आणि त्यातील प्राणी किती खास आहेत याचा संदेश देखील त्यांना समजत आहे. वन्य प्राणी आणि पक्षी हे आपले वारसा आहेत आणि जर आपण त्यांना वाचवले तर भावी पिढ्यांनाही असे दृश्ये पाहता येतील.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @rakesh_bhatt_naturalist नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे पाहून खरंच मजा आली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देशाचा राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्षी एकाच फ्रेममध्ये, शाही मिलन!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वाघ फक्त भूक लागल्यावरच शिकार करतो, छान व्हिडिओ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.