अति घाई कारचालकाला पडली महागात, ओव्हरटेकच्या नादात गाडी पुलावरून पडली खाली, मृत्यूचा थरारक खेळ Viral
गाडी चालवताना आजूबाजूला पाहणे, वेग नियंत्रणात ठेवणे अशा अनेक गोष्टी ध्यानात ठेवणे फार महत्त्वाचे असते अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. त्यातही चालू रस्तयावर जर तुम्ही गाडी चालवत असाल तर मग तुम्हाला आणखीन सावधान राहिले पाहिले. रस्त्यांच्या या वळणावर कधी कुणाचे काय होईल ते सांगता येत नाही. कधीही रस्त्यावर गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे मात्र अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघाताला बळी पडतात.
सध्या अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कारचालकाने केलेला ओव्हरटेक त्याला चांगलाच महागात पडल्याचे दिसून येत आहे. व्यक्ती घाईगडबडीत चुकीचा मार्ग निवडतो आणि तो मार्ग थेट त्याला मरणाच्या दारात नेऊन पोहचवतो. याचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत.
हेदेखील वाचा – शेवटी कलियुगच हे! नातवाने आजीला बॅटने मारलं, ती रडत राहिली पण… काळीज पिळवटून टाकणारा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुंद रास्ता आहे ज्यावर वाऱ्याच्या वेगाने अनेक गाड्या धावत आहेत. तेवढ्यात पाठीमागून एक चारचाकी गाडी वेगाने येते. ही गाडी गाडी उजवीकडचा रस्ता मोकळा असताना देखील डावीकडून दोन गाड्यांच्या मधून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण या नादात पुढच्या गाडीचा धक्का लागून ड्रायव्हरचं स्टेअरिंगवरील संतुलन बिघडतं आणि मग शेवटी नको तेच घडून बसत.
ओव्हरटेक केल्यामुळे शेवटी ही गाडी हवेत उचलली जाते आणि जोरदार पलटी मारत मागून येणाऱ्या गाडीच्या वर जाऊन अटकते. अचानक असे काही झाल्याने ज्या गाडीवर ही चारचाकी आदळते त्याचा चालक आपली गाडी डाव्या दिशेने वळवतो ज्यमुळे ही गाडीदेखील त्या दिशेला वेगाने वळली जाते आणि थेट पुलाच्या खाली फेकली जाते. ही घटना नक्की कुठली आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
हेदेखील वाचा – जीवाशी खेळ! मस्ती मस्तीत पेटता सुतळी बॉम्ब तरुणाने टाकला मित्राच्या तोंडात अन्… धक्कादायक Video Viral
अपघाताच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ @viralinmaharashtra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चाइना माल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” हे खरंच अस घडलं की एडिटिंग आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.