आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं... Video Viral
अविवाहित मुलांसाठी स्वयंपाक करणे हे कठीण काम मानले जाते. आपल्याकडे बहुतेक मुलींना स्वयंपाकाची आवड असते. पण मुलं मात्र स्वयंपाकापासून फार दूर असतात. अशात कधी तरी स्वयंपाकाचा किडा त्यांच्यात घुसला की मग धुमाकूळ हा घडतोच. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात काही मुलांनी मिळून कुकिंग केल्याचे दिसून आले. पण ही कुकिंग पूर्ण होता होताच स्वयंपाकघरात वेगळाच धुमाकूळ माजतो. आता यात पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात तुम्हाला स्वयंपाकघरात तीन मुले उभी असलेली दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एका मुलाने बटाटे धरले आहेत, दुसऱ्याने तेल ढवळले आणि तिसरा व्यक्ती या तेलात काहीतरी घालताना दिसत आहे. बहुधा, तिन्ही मुले बटाट्याच्या फिंगर चिप्स बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जेव्हा तेलात बटाटे घातले जातात तेव्हा एका क्षणातच तिथे आगीचा मोठा विस्फोट होतो आणि सर्वत्र फक्त आगीचे तेज दिसून येते जे पाहणे भयानक ठरते. बहुदा तेल खूप गरम झाले असते, ज्यामुळे आगीची एक मोठा लोट तिघांच्याही चेहऱ्यावर आली. आता या घटनेत पुढे काय घडलं ते मात्र व्हिडिओत स्पष्ट करण्यात आलं नाही. पण व्हिडिओतील दृश्ये पाहून लोकांना मात्र चांगलीच धडकी भरली.
काम ऐसा करो की नाम रोशन हो जाय 😜😂 pic.twitter.com/yBlVZwOM91 — talwar vipin ❤️ (@vipintalwar74) October 2, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @vipintalwar74 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘काम असं करा ही सगळीकडे प्रकाश होऊन जाईल’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशा प्रकारे काम करा की केवळ तुमचे नावच नाही तर तुमचे रेकॉर्ड देखील चमकतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काम अशा पद्धतीने करा की जवळ उभा असलेला माणूसही म्हणेल, तुम्ही ते सोडा, मी ते करतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सत्यानाश”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.