(फोटो सौजन्य: X)
प्रवास करताना मृत्यू कधी, कुठे, कसा भेटेल याचा काही नेम नसतो. सोशल मीडियावर अशा अनेक धक्कादायक अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे क्षणभरात हृदय सुन्न करणारे असतात. अशाच प्रकारची एक भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये घडली असून, हरिद्वारमध्ये अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्घटना टीटवी-पाणिपत-खातिमा राष्ट्रीय महामार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब आपल्या जवळच्याच्या अस्थी घेऊन हरिद्वारला निघाले होते. प्रवासादरम्यान, गाडी अत्यंत वेगात चालवली जात होती, आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. चालकाला बहुधा झोप लागल्याने, त्याला समोर उभा असलेला कंटेनर वेळेत दिसला नाही. काही क्षणातच कार जोरात कंटेनरवर जाऊन आदळली. अपघात इतका भयानक होता की, गाडीचा चक्काचूर झाला आणि सहाही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
या भीषण अपघाताचा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.
एक चूक… आयुष्यभराची किंमत
हे प्रकरण केवळ एका अपघाताचे नसून, वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियम पाळले नाही, तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण आहे. वेगात गाडी चालवणं, विश्रांती न घेता सतत प्रवास करणं, झोपेच्या झटक्यांकडे दुर्लक्ष करणं, या सगळ्यांचा शेवट अनेकदा अशाच शोकांतिकेत होतो.
एकच घर, सहा चितांमध्ये रुपांतर
या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाचा आघात झाला आहे. अस्थि विसर्जनासाठी निघालेलं एक घर, आता स्वतःच्या माणसांच्या अस्थी उचलण्याच्या दु:खात बुडालं आहे. हा प्रसंग केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येकासाठी एक चेतावणी आहे.
🚨Muzaffarnagar UP: Six members of the same family, traveling in a Maruti Ertiga car to Haridwar for asthi visarjan, lost their lives after the driver, reportedly drowsy, rammed into a parked truck on the Titawi–Panipat–Khatima Marg. pic.twitter.com/Dnd2Zw3MZt — Deadly Kalesh (@Deadlykalesh) October 1, 2025
या घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ड्रॉयव्हरच लक्ष कुठे होतं?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप वाईट घटना आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणूनच नेहमी सीट बेल्ट बांधून बसायला हवं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.