पापा की परी, आता जा घरी...! फव्वारा आला अन् एका क्षणातच मुलीला उडवून घेऊन गेला... Video Viral
सोशल मिडियाच्या दुनियेत एक नवीन मजेदार व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी मजेदार आहेत की ती पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. ‘नजर हटी तो दुर्घटना घटी’ ही म्हण तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल. सध्या या म्हणीचीच प्रचीती देणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात खरंतर एका मुलीसोबत एक दुर्घटना घडून आली आहे पण ही घटना इतक्या वेगात घडते की याला काहीसे हास्यास्पद रुप प्राप्त होते. मुलीसोबत घडलेली ही घटना तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू दोन्ही आणेल. चला तर मग नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात स्पष्ट दिसते की, चालू रस्त्यावर एक पाण्याचा फव्वारा सर्वत्र पाण्याचा शिडकाव करत आहे. आता हा फव्वारा नक्की कशामुळे रस्त्यावर निर्माण झाला हे समजले नसले तरी यामुळे पुढे एक मोठी दुर्घटना घडून येते. रस्त्यावर काही मुलं या फव्वाऱ्यापासून आपला जीव वाचवत असतानाच एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी असते. तिच या सर्व गोष्टींकडे फारसं लक्ष नसतं ज्यामुळे पाण्याचा फव्वारा तिच्या दिशेने येत असतानाच तिला काय करावं ते सुचत नाही, ज्यामुळे क्षणातच ती या फव्वाऱ्यासोबत उडत जाऊन रस्त्यावर जोरदार आदळली जाते. यावेळी तिची सायकलही तिच्यासोबत फव्वाऱ्यात दूर उडून जाते. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या काहींनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली ज्यानंतर घटनेचे हे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. मुलीसोबत घडलेली ही घटना सर्वांनाच थक्क करत असून काहींनी तिच्याविषयी हळहळ व्यक्त केली आहे.
घडलेली सदर घटना फारच थक्क करणारी असून याचा व्हिडिओ @b0bbymclovin नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती फक्त तिच्या नशिबाला स्वीकारत तिथेच उभी राहिली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती शेवटपर्यंत आपल्या सायकलला धरुन होती, हे मला आवडले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला वाटलं की ती कॅप्टन मार्वल आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.