संपूर्ण नवरदेव समाज घाबरलेला आहे! बुटांसाठी नवरदेवाला अक्षरशः जमिनीवर लोळवलं... वराची अवस्था पाहूनच हादरालं; Video Viral
लग्न म्हटलं की यात अनेक मजेदार आणि हास्यास्पद घटना घडून येत असतात. नवरा-नवरीचे फोटोज, पाहुण्यांचा तांडव आणि अशा अनेक रोमांचक घटना लग्नात घडत असतात. आता भारतीय परंपरेनुसार, लग्नात अनेक विधींचे पालन केले जाते आणि त्यातील एक पारंपरिक आणि सर्वांच्या आवडीचा विधी म्हणजे नवरदेवाची चप्पल चोरण्याचा कार्यक्रम. यामध्ये नवरीकडचे नवरदेवाची चप्पल चोरतात आणि ही चप्पल परत करण्यासाठी नवरदेवाकडून काही पैसे घेतले जातात. हा एक मजेदार सोहळा असतो ज्यात नवरीकडचे आणि नवऱ्याकडचे यांच्यात मिश्किल वादावादी होते आणि मग एक सामंजस्य करार करत नवरदेव करवाल्यांना काही पैसे देऊ करतो.
हरवलेल्या चिमुकल्या गजराजाची आईशी करून दिली भेट; धावत पळत आला अन् आईलाच बिलगला; क्युट Video Viral
मात्र नुकताच एका लग्नातील एक भीषण प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे ज्यातील दृश्ये पाहून सर्वच हादरून गेले आहेत. व्हिडिओमध्ये मुलीकडच्या लोकांनी नवरदेवाची चप्पल चोरण्यासाठी त्याला अक्षरशः जमिनीवर लोळवल्याचे दृश्य दिसून आले आहे. व्हिडिओतील हे दृश्य इतके भयानक आहेत की भविष्यात होऊ पाहणारे सर्व नवरदेव आता चिंतेत पडले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक नवरदेव जमिनीवर पडल्याचे दिसून येत आहे तर मुलीकडचे नवरदेवाच्या पायातून त्याची चप्पल चोरी करताना दिसून येत आहेत. लग्नातील या सोहळ्यासाठी लोकांनी नवरदेवाशी अक्षरशः कुस्ती केल्याचे दिसून येत आहे. त्याचे हाल पाहून सर्वच काळजीत पडले असून लग्नातील हे दृश्य आता मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर शेअर केले जात आहे.
लग्नाचा हा व्हिडिओ @sgpranchi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “विधी जबरदस्तीने नव्हे तर प्रेमाने करावेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बरं झालं माझ्या लग्नात असं काही झालं नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “नवऱ्याची चप्पल नाही चोरली तर त्याची इज्जत लुटली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.