(फोटो सौजन्य: X)
कोणतेही मुलं हे आपल्या आईशिवाय राहू शकत नाही. आईची माया आपल्या बाळाला एका क्षणासाठीही वेगळं करू देत नाही. आई मुलामधील जिव्हाळ्याचे हे नाते फक्त माणसांमधीच नाही तर प्राण्यांमध्येही तितकेच घट्ट असते. आई-मुलाच्या नात्याची नव्याने ओळख करून देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वन-विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका हरवलेल्या हत्तीची त्याच्या आईशी भेट करून दिल्याचे दिसून येत आहे. आईला पाहताच हत्ती इतका आनंदित होतो की धावत पळत आईला जाऊन बिलगतो. हत्तीचे हे गोंडस रूप आणि आईवरची त्याची माया पाहून आता सर्वच सुखावून गेले आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात वन अधिकाऱ्यांच्या मदतीने एका हत्तीच्या बाळाचे त्याच्या आईशी मिलन करून देण्यात आले. निवृत्त भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा या घटनेचा एक सुंदर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक अतिशय भावनिक क्षण दिसून येत आहे, ज्यात हत्तीचे बाळ मदतीसाठी वन विभागाच्या वाहनाकडे धावते. व्हिडिओमध्ये हत्तीचे बाळ घाबरत आपल्या आईला शोधत असल्याचे समजते. वनविभाग अधिकारी काळजीपूर्वक हत्तीच्या बाळाची त्याची आईशी भेट करवून देतात. ते त्याला त्याची आई ज्या भागात आहे तिथे घेऊन जातात ज्यानंतर आपल्या आईला पाहताच चिमुकला हत्ती खुश होतो आणि धावत पळत आईजवळ जात तिच्यासोबत जंगलात निघून जातो. घटनेचा व्हिडिओ फारच सुंदर असून प्राण्यांमधील हे जिव्हाळ्याचे नाते पाहून आता सर्वचजण भावुक होऊन गेले आहेत. लोक पुन्हा पुन्हा हे दृश्य पाहत असून याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.
पोलीसच बनले चोर! प्रवाशांच्या थेट खिशात घातला हात अन्…; VIDEO तुफान व्हायरल
चिमुकल्या हत्तीचा हा व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण त्यांना कसे समजले की तीच त्याची आई आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छोटू” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आनंदी पुनर्मिलन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.