VIRAL VIDEO : चिमुकल्याने आजोबांच्या अस्थी खाल्ल्या अन्... ; पुढे जे घडलं पाहून आईनेही लावला डोक्याला हात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. शिवाय लहान मुलांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असती. ही लहान मुले कधी काय मस्ती करतील, कधी काय बोलतील याचा नेम नसतो. लहान मुले आपल्या वागण्याने अनेकदा मोठ्यांना आश्चर्यात पाडतात. सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्याने असे काही केले आहे की, त्याच्या आईला देखील डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यामध्ये एका चिमुकल्याने आपल्या आजोबांच्या अस्थी खाल्ला आहेत. तसेच त्याची राख सर्वत्र घरबर पसरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार ब्रिटनमध्ये घडला आहे. एका चिमुकल्याच्या हाती आजोंबाच्या अस्थीचा कलश लागला. त्यानंतर त्या चिमुकल्याने तो कलश उघडला आणि त्यातील राख खाल्ली. तसेच ती राख संपूर्ण घरभरही पसरवून ठेवली. यावेळी चिमुकल्याची आई स्वयंपाक घरात काम करत होती. याच वेळी खेळता खेळता चिमुकल्याला आजोबांच्या अस्थीचा कलश सापडला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकला पूर्णपणे राखेत माखलेला दिसत आहे. त्याच्या आईने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @fratshows या अकाउंटवर शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने “व्हिडिओ बनवणे बदं करा, आधी मुलाला मदत करा” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने “पहिल्यांदा चिमुकल्याला स्वच्छ करा” असे म्हटले आहे. तर आणखी एकाने “अशा गोष्टी मुलांच्या नजरेपासून दूर ठेवायच्या असतात” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.