क्षणात पलटला डाव...! सापाच्या हल्ल्यात त्याचीच झाली शिकार, छोट्या प्राण्याने चक्क चावून चावून पाडला फडशा; Video Viral
जंगलाचे जग हे आपल्याला वाटते तितके साधे नाही. इथे नेहमीच अशा घटना घडत असतात, ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. शिकारीचे, आईच्या मायेचे आणि प्राण्यांच्या मस्तीचे बरेच व्हिडिओज इथे दररोज शेअर केले जातात. अशातच सापाच्या शिकारीचा व्हिडिओ आता इथे चांगलाच व्हायरला झाला आहे, ज्यात एका छोट्या प्राण्याने सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करत त्याला अक्षरश: चावून चावून खाल्ल. ही घटना इंटरनेटवर मात्र आता सर्वांनाच अचंबित करत आहे कारण सापासारख्या विषारी प्राण्याची शिकार इतक्या लहान प्राण्याकडून होणं आणि तेही इतक्या निर्दयतेने… हे दृश्य नक्कीच सर्वांसाठी आश्चर्याने भरलेलं होत, ज्यामुळे कमी वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी लगेचच हे दृश्य शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात चिमुकल्या प्राण्याला पाहताच साप त्याच्यावर हल्ला करत असल्याचे दृश्य दिसून येते पण तितक्यातच प्राणी आपल्या हाताने सापाच डोकं पकडतो आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला चावून चावून खाण्यास सुरुवात करतो. त्याला हा हल्ला सापासाठीही धक्कादायक असतो. यावेळी त्याच्या हाताची पकड इतकी जबरदस्त असते की सापाला त्याच्या तावडीतून सुटताना नाकीनऊ येतात. व्हिडिओमध्ये प्राणी सापाला चावून चावून खाताना आणि त्याचा फडशा पाडताना दिसून येतो. काही यूजर्सचा असा दावा आहे की, व्हिडिओतील हा प्राणी ओलिंगुइटो असावा.
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 16, 2025
दरम्यान सापाचा शिकारीचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे सापाला अपेक्षा नव्हती की तो छोटा राक्षस बीस्ट मोडमध्ये जाऊन सापाला चावेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही एक अतिशय धोकादायक लढाई आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिचारा साप”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.