रील बनवत महादेवाची पूजा करत होती महिला तितक्यात देवाने दिलं कर्माच फळ... पाहून हसूच आवरता येणार नाही; Video Viral
श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिना भगवान शंकराला समर्पित असून याकाळात भाविक भगवान शिवाची मनोभावनेने पूजा करतात. हा महिना व्रत-वैकल्यासाठी एक महत्त्वाचा महिना मानला जातो. अशातच आता नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक महिला शिवलिंगाची पूजा करताना दिसत आहे. पण यावेळी तिच्या मनात देवाप्रती कोणतीही प्रेमळ भावना नसून फक्त एक रील शूट करण्यासाठी ती हे सर्व करत असते. अशात देव तिला तिच्या कर्माच फळ लगेचच देतो आणि पुढच्याच क्षणी तिच्यासोबत असे काही घडते की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. आता व्हिडिओत महिलेसोबत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी नाही तर रीलवर व्युज मिळवण्याच्या नादात महिलेने खोट्या भक्तिभावाचा संपूर्ण थाट मांडलेला असतो, ज्याचे फळ तिला तिथल्या तिथे मिळते आणि जन्माची अद्दल घडते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, नदीकिनारी एक शिवलिंग ठेवल्याचे दिसून येते. महिला जिने भगव्या रंगाची साडी घातली असते आणि आपले संपूर्ण केस खुले करून ती शिवलिंगाच्या जवळ जाऊ पाहते पण शिवलिंगाचा स्पर्श करण्याआधीच तिचा तोल ढासळतो आणि ती घरंगळत नदीत पडते. रीलसाठी देवाच्या पूजेचे सोंग घेतलेल्या महिलेसोबत घडलेली ही घटना सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणते. तिला जणू देवानेच हा आशीर्वाद दिला आहे अशी प्रतिक्रिया आता लोक व्हिडिओवर व्यक्त करत आहेत.
महादेव ने भक्ति का फल तुरंत दे दिया. pic.twitter.com/CNhm6pBlhU
— कुंभकरण (@_kumbhkaran) July 24, 2025
देवावर श्रद्धा ही मनोभावनेने करावी, दिख्याव्यासाठी केलेली पूजा कधीही आपल्याला फलत नाही. रीलसाठी लोकांनी सर्वच गोष्टींचा मजा बनवायला सुरूवात केली आहे, कुठे कधी काय करावं याच लोकांना भान राहीलं नाही. महिलेसोबतची ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून लोकांनी याची जोरदार मजा लुटली आहे. घटनेचा व्हायरल व्हिडिओ @_kumbhkaran नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘महादेवाने भक्तीचे फळ लगेच दिले’ असे लिहिले आहे तर अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “महादेवाने म्हटलं की, जा पहिले आंघोळ करून ये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रील भक्तांना असेच फळ देत राहा महादेवजी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.