फोटो सौजन्य - Social Media
खाल्या मीठाला जागणे! म्हणजे काय? याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ! सोशल मीडियावर अशा अनेक निरनिराळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. पण अशामध्ये एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. माकडाला त्याच्या आजारी मालकाविषयी असलेली माया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये? चला तर मग जाणून घेऊयात.
ही व्हिडीओ @viral_india.official या सोशल मीडिया पेजने शेअर केला आहे. या पेजमध्ये एक माकड आणि तिचा आजारी मालक दिसून येत आहे. मालक फार आजरी पडलेला दिसून येत आहे. मुळात, त्या व्हिडिओची विशेष गोष्ट म्हणजे जसजसं त्या मालकाला खोकला लागतो तसाच शांत पडलेला माकड मालकाच्या काळजीपोटी उठतो आणि त्याला धीर देण्यासाठी त्याच्याजवळ जातो. असे एकदा नव्हे तर अनेकदा होत असते.
माकडाचे आपल्या आजारी मालकाला धीर देणे. त्याची काळजी करणे, हे सारं दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘माकड असो वा इतर प्राणी, त्यांनाही भावना असतात. ते ही खाल्ल्या मीठाला जागतात. या जगात आपलं कोण आहे? या गोष्टीची समज त्यांनाही असते.एकंदरीत, त्यांना आपल्या जीवलगांसाठी असणाऱ्या खोल भावना आणि काळजी, या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.
ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून, नेटकऱ्यांनी या व्हायरल माकडासाठी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांच्यात असणाऱ्या भावनेची जाण नेटकऱ्यांना प्रचन्ड भावले असल्याची साक्ष या व्हिडीओ खालचा कमेंट्स सेक्शन देत आहे. या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. एका नेटकाऱ्याने असे म्हंटले आहे की,”मानवापेक्षा जास्त भावना या प्राण्यांमध्ये असते.” तर दुसऱ्या नेटकऱ्याचे असे म्हणणे आहे की, “मानवापेक्षा जास्त माणुसकी या माकडांमध्ये आहे.” तर एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की, “खाल्ल्या मीठाला जागणे! याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे…”