वाघाला डिवचणं व्यक्तीला चांगलंच महागात पडले; क्षणातच अंगावर चढला अन् पंज्यांनी फाडून टाकलं... Video Viral
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे कधी मजेदार दृश्य शेअर केले जाते तर कधी थक्क करणारे दृश्य यासहच इथे काही असे व्हिडिओही शेअर केले जातात जे आपल्या अंगाचा थरकाप उडवतील. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे असे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील. अशात आताही इथे थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जंगलाचा धोकादायक शिकारी वाघाशी मस्ती करताना दिसून आला आहे. मात्र काहीच क्षणात त्याला ही मस्ती महागात पडते आणि वाघ त्याच्यावर जीवघेणे हल्ला करतो. व्हिडिओत पुढे काय घडते ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाघासोबत मस्ती करत त्याला डिवचताना दिसून येतो. खरंतर, तो माणूस थायलंडमधील फुकेत येथील प्रसिद्ध टायगर किंगडमला भेट देण्यासाठी गेला होता. व्हिडिओमध्ये तो वाघासोबत चालताना दिसत आहे. वाघाचा काळजीवाहक पुढे चालताना दिसतो आणि त्याच्या मागे असलेला माणूस बागेत फिरताना दिसतो. वाघासोबत चालत असतानाच अचानक हा व्यक्ती वाघाला त्याच्या हातातील स्टिक टोचावत त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो मात्र वाघ यावर गप्प बसत नाही आणि लगेच व्यक्तीवर हल्ला चढवतो. हा हल्ला इतका थरारक आणि जीवघेणा असतो की व्हिडिओ बनवत असणारा व्यक्ती देखील त्याने हादरतो आणि पुढील दृश्ये आपल्याला ब्लर दिसू लागतात. ही हृदयद्रावक घटना आता सोशल मीडियावर चांगलीच शेअर करण्यात आली असून लोक यातील दृश्यांनी घाबरून गेली आहेत. माहितीनुसार, ट्रेनरने वेळीच पर्यटकाचे प्राण वाचवले, ज्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली.
Apparently an Indian man attacked by a tiger in Thailand.
This is one of those paces where they keep tigers like pets and people can take selfies, feed them etc etc.#Indians #tigers #thailand #AnimalAbuse pic.twitter.com/7Scx5eOSB4
— Sidharth Shukla (@sidhshuk) May 29, 2025
वाघाने हल्ला केलेला माणूस भारतीय आहे. या घटनेचा व्हिडिओ @sidhshuk नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनहुन अधिकच्या व्युज मिळाल्या असून लाखो लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो माणूस वाचला का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या वाघांना ड्रग्ज दिले जातात आणि त्यांचा गैरवापर केला जातो” .
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.