एका सेकंदात कासवाने गिळला जिवंत खेकडा, कासवाचे थरारक रूप पाहून तुम्हालाही बसेल धक्का, एकदा पहाच Viral Video
वन्यप्राण्यांशी संबंधित व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातील व्हिडीओ आपल्याला हादरवून सोडतात, तर काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसू फुटते. लोकांना प्राण्यांच्या जीवनाशी निगडित असे व्हिडिओज पाहायला फार आवडते. त्यातच आता असाच प्राण्यांशी संबंधित एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे जो आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. यातील धक्कादायक दृश्ये लोकांना आश्चर्यचकित करत आहेत. नक्की असे काय आहे व्हिडिओत? चला जाणून घेऊयात.
नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कासव एका जिवंत खेकड्याची शिकार करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, कासव एका झटक्यात जिवंत खेकडा मारून त्याचा आस्वाद घेतो. आजवर आपण कासवाकडे एक शांत आणि संथ गतीने चालणारा प्राणी म्हणून पाहिले मात्र व्हायरल व्हिडिओतील त्याचा शिकारीचा वेग पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हे दृश्य पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरचा विश्वास बसणार नाही.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कासवाच्या समोरून एक खेकडा जात असल्याचे पाहायला मिळत आहे. खेकड्याला कल्पना नसते की, पुढच्या क्षणी तो कोणाचे तरी जेवण बनणार आहे. सुरुवातीला कासव खेकड्याकडे शांतपणे पाहत राहतो आणि खेकडा तोंडाजवळ येताच कासव त्याच्यावर हल्ला करतो. या हल्ल्यात तो क्षणाचाही विलंब न करता एका झटक्यात त्याला जिवंतच गिळून टाकतो. खेकडा गिळल्यानंतर कासव पूर्णपणे सामान्य स्थितीत येतो, जसे काही घडलेच नाही. कासवाच्या शिकारीतील हा थरार आणि कासवाचे हे नवे रूप पाहून सोशल मीडिया युजर्स हादरले आहेत.
Bro? 💀💀 pic.twitter.com/6sBwpeyrdk
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) December 11, 2024
कधीही न पाहिलेलं दृश्य! एकमेकांना गुंडाळलं अन्…सापांच्या रोमॅंटिक कपल डान्सचा Video Viral
कासवाच्या थरारक आणि वेगवान शिकारीचा हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 60 हजाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. लोक फार मजा घेऊन हा व्हिडिओ पाहत आहेत आणि शेअर देखील करत आहेत. त्याचे हे असे थरारक रूप आजवर कोणीही कधीही पाहिले नसल्याने लोक यावर आपल्या शॉकिंग प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहीले आहे, “त्याने खरंच त्याला खाल्ले का, हे पाहण्यासाठी आता मला हे पुन्हा पाहायला लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणजे कासवं वेगवान असतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.