जेव्हाही आपण कोणत्याही प्राण्याच्या रोमँटिक जीवनाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे साप-नागाचे जोडपं. हे बॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये दाखवले जाते आणि ते कथानक म्हणून सादर केले गेले. मात्र, तुम्ही या प्राण्यांची जोडी क्वचितच नाचताना आणि रोमँटिक मूडमध्ये पाहिली असेल. साप हा मुळातच एक धोकादायक आणि विषारी प्राणी आहे, याला पाहताच लोक यापासून दूर पळू लागतात मात्र सध्या व्हायरल होत असलेले दृश्य तुम्हाला थांबून सापाच्या जोडप्याला पाहण्यास प्रेरित करेल.
तुम्ही चित्रपटांमध्ये साप नाचताना अनेक गाणी आणि व्हिडिओ पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला त्याचा लाईव्ह सीन दाखवणार आहोत, ज्यामध्ये हे कपल एकमेकांपासून वेगळे व्हायला तयार नाही. ते अगदी आनंदी मूडमध्ये असल्यासारखे काही मिनिटे एकमेकांसोबत नाचताना तुम्ही पहाल. काही लोक याकडे भांडण म्हणून पाहत आहेत परंतु बहुतेक लोक याला रोमँटिक डान्स म्हणून पाहत आहेत. कधी न पाहिलेले असे हे दृश्य सोशल मीडियावर शेअर होताच आता ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी भरवणारा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, महाकाय साप आणि नाग झाडीत डोलताना एकमेकांसोबत रस्त्यावर येतात. या वेळी साप एकमेकांना चिकटून बसलेले दिसतात. ही विचित्र कृती पाहून तेथून जाणारे लोक हैराण झाले. त्यांच्याकडे असे बघून असे वाटते की, बहुधा हा नाग-नागिनचा रोमँटिक डान्स असावा, जो सहसा दिसत नाही. सापांचे हे अनोखे वर्तन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोक या व्हिडिओला मजा घेऊन पाहत आहेत आणि शेअर देखील करत आहेत.
रियल नाग नागिन का नृत्य 👌 pic.twitter.com/HPEWYvMj8i
— Disha Rajput (@DishaRajput24) December 9, 2024
सापांच्या या नृत्याचा अनोख्या व्हिडिओ @DishaRajput24 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रियल नाग आणि नागीणचे नृत्य असे लिहिण्यात आले आहे’. व्हिडिओला बऱ्याच युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जय हो नाग देवता महाराज” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे नृत्य भारतीय परंपरांमध्ये, विशेषत: महाकाव्ये आणि पुराणांसारख्या धार्मिक कथांमध्ये पाहिले जाते, जेथे देवत्व आणि शौर्याचे सामर्थ्य नाग आणि नागांच्या रूपात चित्रित केले जाते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.