
Dubai Road Accident : दुबईतील रस्ते अपघातात राजस्थानातील तिघांचा मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
Dubai Road Accident : दुबईत झालेल्या रस्ते अपघातात राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील दादू गावच्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा परसली आहे.
अपघाताच्या जवळपास 15 दिवसानंतर अमीलाल झाझरिया, धर्मपाल झाझरिया आणि नरेंद्र झाझरिया यांचे मृतदेह गावी आणण्यात आले आहेत. अमीलाल यांचा मृतदेह शनिवारी गावात दाखल झाला, तर धर्मपाल आणि नरेंद्र यांचा मृतदेह रविवारी गावी आणण्यात आला.
या अपघातातील एक व्यक्ती कामाच्या शोधात नुकताच दिल्लीत दाखल झाला होता, तर दुसरा व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या उदर्निवाहासाठी मागील 11 वर्षांपासून दुबईत काम करत होता. दुबईत काम करणाऱ्या गावातील एक व्यक्ती कृष्णा झाझरियाच्या मते, ही घटना रविवारी 1 नोव्हेंबरला झाली. सुभाष यांचा मुलगा धर्मपाल झाझरिया (40) आपल्या चार सहकारी फूलराम यांचा मुलगा अमीलाल झाझरिया (40), नरेंद्र झाझरिया (30) तसेच भैराराम यांचा मुलगा विजेंद्र सिंह (35) आणि ओमप्रकाश मेघवाल यांच्यासोबत फिरण्यास गेले होते.
दिवसभर फिरल्यानंतर धर्मपाल चालवत असलेल्या कारने आपल्या कंपनीच्या रहिवासी परिसरात परतत होते. मात्र दुबईच्या जेबेल अली परिसरातील एका वळणावर त्यांच्या कारसमोर एक ट्रेलर आला व त्याने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, अमीलाल, नरेंद्र आणि धर्मपाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर विजेंद्र गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, ओमप्रकाश यांना जास्त दुखापत झाली नव्हती. पाचही जणांना रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती कळतात विजेंद्र यांचे मोठे भाऊ श्रीचंद आणि धर्मपाल यांचा छोटा भाऊ कृष्णा जे दोघेही दुबईत काम करत होते, तातडीने रुग्णालयात दाखल झाले. विजेंद्र यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर मृतदेहांना भारतात आणण्याच्या प्रक्रियेसाठी धर्मपाल यांचा चुलत भाऊ राकेश मील आणि श्रीचंद यांनी मदत केली.
दुबईत काम करण्याचा या तिघांचा इतिहास वेगवेगळा आहे. अमीलाल हे मागील सात महिन्यांपासून दुबईत काम करत होते. तर नरेंद्र झाझरिया 24 ऑक्टोबरला दुबईत पोहचलेले. अपघाताच्या फक्त पाच दिवसाआधीच त्यांनी आपली नोकरी सुरू केलेली. तसेच धर्मपाल झाझरिया मागील 11 वर्षांपासून ‘अजीजी’ कंपनीीत एका बस ड्रायव्हरच्या रुपात काम करत होते. विजेंद्र सिंहही जवळपास सहा महिन्यांपूर्वी ‘ट्रांसगार्ड’ कंपनीत दाखल झाला होता. ओमप्रकाश मेघवालही दुबईतील एका कंपनीत काम करतो.
Ans: दुबईतील भीषण रस्ते अपघातात राजस्थानच्या तिघांचा मृत्यू झाला आहे.
Ans: अमीलाल झाझरिया, धर्मपाल झाझरिया आणि नरेंद्र झाझरिया अशी मृतांची नावे आहेत.
Ans: धर्मपाल झाझरिया कार चालवत असताना त्यांच्या कारला एका ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.