
80-Year-Old Man Celebrates His Own Terahvi in Uttar Pradesh ( उत्तर प्रदेशात ८० वर्षीय वृद्धाने स्वतःचीच 'तेरवी' साजरी )
आपल्या मृत्यूची वाट न पाहता, जिवंतपणीच आपला तेरावा दिवस (तीर्थवी) साजरा करून त्यांनी सर्व समाजाला आश्चर्यचकित केले. त्यांचा तेरावा दिवस (तीर्थवी) रविवारी गावात साजरा झाला,यामध्ये 900 लोकांच्या उपस्थितीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय.
यात विषेश बाब म्हणजे.राज्यमंत्री के. पी. मलिक, चौधरी समाजाच्या सदस्यांसह, या अनोख्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे, बलजोर सिंग स्वतः संपूर्ण सोहळ्यात उपस्थित होते आणि त्यांनी आपली पगडी नातू मुकुलकडे सोपवून कुटुंबाची जबाबदारी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली.विशेष म्हणजे, बलजोर सिंग स्वतः संपूर्ण सोहळ्यात उपस्थित होते आणि त्यांनी आपली पगडी नातू मुकुलकडे सोपवून कुटुंबाची जबाबदारी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली.
उत्तर प्रेदेशातील बागपत जिल्ह्यातील जोहरी गावात हा अजब प्रकार पाहायला मिळाला. घडलेल्या प्रकारा बद्दल संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला. आपल्या गावातल्या घरातल्या अंगणात मोठ्या काढया पेटवण्यात आल्या होत्या आणि मिठाईवाल्यांनी पुरी, रायता, दोन प्रकारच्या भाज्या आणि लाडू यांसारखे विविध पदार्थ तयार केले होते. त्याच बरोबर सकाळच्या वेळेस होम हवन करण्यात आले आणि दुपारी सुमारे ९०० लोकांसाठी मेजवानीचा ठेवण्यात आली.
सहसा, तेराव्या दिवशी, कुटुंबातील सदस्य आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी एकत्र जमत असतात. पण येथे, बलजोर सिंग स्वतः पाहुण्यांमध्ये उपस्थित राहून स्वागत करत होतो. ते स्वताहा लोकांचे स्वागत करत होते. त्याच बरोबर ते स्वताहा लोकांमध्ये बसून या समारंभात उपस्थित होते.
आपल्या हयातीत आपल्या सर्व ओळखीच्या लोकांना एकत्र जमवून त्यांच्यासोबत जेवण करावे, अशी त्यांची इच्छा होती. हा विचार मनात ठेवून, त्यांनी जिवंतपणी आपला तेरावा दिवस साजरा करण्याचे ठरवले. कुटुंबानेही त्यांच्या इच्छेचा आदर केला आणि संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेतली.
उत्तर प्रदेश के बागपत में में एक तेरहवीं चल रही थी। हलवाई भोज बना रहे थे। 900 लोग न्योते पर आए थे। लेकिन जिस आदमी की तेरहवीं हो रही थी, वही आदमी जिंदा खड़ा था। 80 साल के बलजोर सिंह ने जीते-जी अपनी तेरहवीं करा ली। बलजोर सिंह के कोई बेटा नहीं है। सिर्फ एक बेटी है। बलजोर सिंह ने तय किया कि मौत के बाद बेटी पर तेरहवीं का बोझ न पड़े। — Madan Mohan Soni (@madanmohansoni) November 16, 2026
या कार्यक्रमातील सर्वात विशेष विधी म्हणजे पगडी बांधण्याचा सोहळा होता. सहसा, कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर, पगडी बांधून जबाबदारी उत्तराधिकाऱ्याकडे सोपवली जाते, पण बलजोर सिंग यांनी हा विधी त्यांच्या उपस्थितीत पार पाडला. त्यांनी आपली पगडी आपला नातू मुकुल याच्याकडे सुपूर्द करण्यात आली.बलजोर सिंग यांच्या कुटुंबात मुलगी पिंकी, जावई सुखपाल, तीन नाती आणि नातू मुकुल यांचा समावेश आहे.
बलजोर सिंग यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला गावातल्या आणि इतर कुटुंबियांनी समावेश घेतलाच पण राज्यमंत्री के. पी. मलिक यांनीही या उपक्रमाला आपली उपस्थिती लावली. बलजोर सिंग यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर हयातीत केले जाणारे विधी पार पाडले. त्यांच्या या उपक्रमाने केवळ गावातच नव्हे तर आसपासच्या परिसरातही एका नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.