अरे बापरे! मार्केटमध्ये आली नवी फॅशन, आता एकाच पायात घाला जीन्स, किंमत ऐकून पायाखालची जमीन हादरेल; Video Viral
बदलत्या काळानुसार आपल्या पेहरावातही अनेक बदल घडून आले. आता बहुतेक लोक पाश्च्यात्य कपडे परिधान करतात ज्यात जीन्स हा प्रकार कॉमन झाला आहे. पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत आजकाल प्रत्येकजण जीन्स परिधान करू लागले आहेत. जीन्समध्येही येत्या काळात अनेक नवनवीन बदल दिसून आले. आताच्या काळात तर रिप्ड जीन्स, पेन्सिल जीन्स असे जीन्सचे अनेक वेगवेगळे प्रकार तयार झाले आहेत मात्र सध्या मार्केटमध्ये जीन्सचा एक अनोखा प्रकार व्हायरल होत आहे ज्याचे नाव वन लेग जीन्स म्हणजेच एका पायाची जीन्स असे आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. ही अनोखी डिझाइन एका फ्रेंच लक्झरी ब्रँडने सादर केली आहे.
किंमत ऐकून थक्क व्हाल
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जीन्सची किंमत. ही जीन्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा एका महिन्याचा पगार घालवावा लागू शकतो, कारण याची किंमत अवघे ₹38,330 ($440) आहे. काही फॅशन प्रेमी याला नवीन ट्रेंड मानत आहेत, तर अनेकांना फॅशनच्या जगात काय होईल याची खात्री नाही. सध्या, हे विचित्र फॅशन ट्रेंड सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे फ्रेंच लक्झरी ब्रँड कॉपर्नीने (Coperni) जगासमोर आणले आहे. काही फॅशनप्रेमी याला नवीन ट्रेंड मानत आहेत, तर अनेकजण याला ‘ॲब्सर्ड’ आणि ‘अव्यवहार्य’ म्हणत आहेत.
16 दशलक्ष फॉलोअर्स असलेली TikTok स्टार क्रिस्टी साराने जीन्स वापरून पाहिली आणि त्यांना ‘इंटरनेटवरील सर्वात वादग्रस्त जीन्स’ म्हणून वर्णन केले. पण तिचा नवरा डेसमंडने ते पाहून खिल्ली उडवली आणि म्हटले की कोणीही ते घालू शकत नाही! यानंतर सोशल मीडियावर या जीन्सवर अनेक मजेदार प्रतिक्रिया देण्यात आल्या. कोणीतरी म्हणाला की या जीन्स जणू कोणीतरी एक पाय बाहेर ठेवून झोपल्यासारखे दिसतात, तर कोणीतरी प्रश्न केला की हे खरोखरच ट्रेंडमध्ये आहे का… त्याच वेळी, काहींचे असे म्हणणे आहे की, जेव्हा हा ट्रेंड सुरु होईल तेव्हा या जीन्स देखील सामान्य दिसू लागतील.
सोशल मीडियावर लोक या जीन्सला ट्रोल करत असले मात्र माहितीनुसार, ही कॉपर्नी जीन्स अजूनही एक्सट्रा स्मॉल, स्मॉल आणि मिडीयम साइझमध्ये पूर्णपणे SOLD OUT झाली आहे. ज्या लोकांना ही जीन्स मिळाली नाही त्यांना आपल्या जुन्या जीन्सचा एक पाय कापून त्याला वापरायला सुरुवात केली आहे. या जीन्सचा व्हायरल व्हिडिओ @kristy.sarah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला, ‘कदाचित इंटरनेटवरील सर्वात वादग्रस्त जीन्स’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून वेगाने आता हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.