(फोटो सौजन्य: Twitter)
सापाचं नाव घेताच अनेकांचे हातपाय थरथर कापू लागतात. हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो. याची दहशत फक्त जंगलातच नव्हे तर शहरांतही तितकीच दिसून येते. अहो, माणसचं काय तर जंगलातला राजाही याला बघून दूर पळू लागतो. अशातच आता सोशल मीडियावर एक भयाण व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात काही मुलं एका मेलेल्या सापाला घेऊन खेळताना दिसून आले. हे दृश्य फार भयानक असून लोकांना आता ते पाहून आश्चर्याचा धक्का मिळत आहे. व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे रात्रीच्या वेळी अंधारात काही मूळ खेळताना दिसून येतात. ते दोरीने उड्या मारत असतात, हा खेळ तुम्हीही लहानपणी कधी ना कधी खेळला असावा मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे, ही मुलं कोणत्या दोरीने नव्हे तर चक्क मेलेल्या सापाला रश्शी बनवत त्याच्यासोबत खेळ खेळत होते. व्हिडीओमध्ये मुलांची मस्ती स्पष्टपणे दिसत आहे, पण असे करणे योग्य आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
व्हिडीओमध्ये मुले हसत-खेळत सापाला दोरीप्रमाणे फिरवत त्यावरून उडी मारत असल्याचे दिसते. “हे काय आहे, मला दाखवा!” असे विचारणाऱ्या एका महिलेचा आवाजही ऐकू येतो. एका मुलाने सांगितले की हा काळ्या डोक्याचा अजगर आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत की मुलं एवढ्या बेफिकीरपणे सापांसोबत कशी खेळू शकतात. काहीजण याला मजेदार मानत आहेत, तर काहीजण याला चुकीचे म्हणत आहेत.
Australian Aboriginal children use dead python as a skipping rope in Woorabinda, Queensland pic.twitter.com/1VfIdL3hIs
— Clown Down Under 🤡 (@clowndownunder) March 10, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @clowndownunder नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘क्वीन्सलँडमधील वुराबिंडा येथे ऑस्ट्रेलियन आदिवासी मुले मृत अजगराचा दोरी म्हणून वापर करतात’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “गेल्या काही काळात मी पाहिलेली ही सर्वात ऑस्ट्रेलियन गोष्ट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते त्यांच्या अन्नाशी खेळत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.