अन् काही सेंकदातच हिरोगीरी उतरली! काका धावत आले, रॉकेट बॉम्बवर उडी मारली अन्...; पुढे काय झाले तुम्हीच पाहा
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ आपण पाहतो. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्य वाटते की खरेच असे घडू शकते का. तसेच सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, ते पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. माणूस खळखळून हसतो. सध्या असाच एका काकांचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका वृद्ध व्यक्तीचा आहे. यामध्ये काकांनी असे काही केले आहे की, त्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हसत आहेत. पम याचे गांभीर्य कोणालाही लक्षात येते नाही. काकांनी जळत्या फटाक्यावर उडी मारली आहे आणि न्ंतर त्यांच्यासोबत असे काही झाले आहे की, पाहून भिती वाटेल. पण शेवट पाहून हसूही येईल.
काकांनी फटाक्यावर उडी मारली
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका आपल्या मित्रांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवत आहेत. मग सगळे मिळून रॉकेट पेटवतात. मागून आवाज येतो, ‘सिंगल शॉट’ आणि मग काका धावत येतात आणि जळत्या रॉकेटवर उडी मारतात. काकांनी उडी मारली त्याच वेळी रॉकेट पेटते आणि त्यांच्या धोतराला आग लागते. काका जखमी झाल्यासारखे वाटते. दुसरीकडे घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण हसण्यात मग्न झालेले दिसत आहेत.
हे देखील वाचा- Viral Video: दारूच्या नशेत व्यक्तीचा अजब कारनामा; बैलासमोर गेला अन्…, पाहा व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर its_ravi_004 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. आत्तापर्यंत व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. पण एका युजरने म्हटले आहे कीी, हिरोगिरी नडली काकांनी तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काकांना आधी दवाखण्यात घेऊन जा मग हसत बसा, नाहीतर. हा व्हिडिओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होत आहे. पण अशी हिरोगिरी काकांना चांगलीच नडली आहे.
हे देखील वाचा- AI च्या मदतीने तरूणाने तयार केला नोकरीचा अर्ज पण…; वाचून लोक हैराण म्हणाले…