फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे मजेशीर व्हायरल होत असतात जे पाहून हसूहसून पोट दुखून येते. कधी डान्स रील्स, तर कधी स्टंटचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जुगाडचे देखील अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय मद्यपान करणाऱ्या लोकांचे देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.
सध्या असाच एक मद्यपान केलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हे दारू पिणारे व्यक्ती नशेत असे काहीतरी करतात की पाहून हसू येते. तसेच एखादा असा कारनामा करतात की, त्यांनाच त्याचा फटका बसतो. असे काहीसे या व्यक्तीने केले आहे. तो दारूच्या नशेत थेट बैलासमोर गेला आणि त्याच्यासोबत असे काही घडले की ज्याचा विचार त्याने केला नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडले?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती दारूच्या नशेत आहे. तो कोणाशी तरी बोलत आहे. बहुतेक तो व्हिडिओ बनवणाऱ्याशी बोलत असावा तिथेच एका बाजूला बैलाला बांधलेले आहे. तो थेट त्या बैलासमोर जातो. बैलासमोर जाऊन तो आपला हात पुढे करतो आणि असे काही बोलतो की बैल त्याला शिंग मारतो आणि उचलतो. तो बैलासमोर जाऊन म्हणतो की, हॅलो सर आणि तेवढ्यात तो बैल त्याला शिंग मारत हवेत उचलतो. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- AI च्या मदतीने तरूणाने तयार केला नोकरीचा अर्ज पण…; वाचून लोक हैराण म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
किसी के हो न सकेंगे
😂😂😂😂 pic.twitter.com/1yAtryZ6s9— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) October 17, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कोणाचीही मालकी नाही.’ व्हिडिओला आत्तापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, दारूची नशा निघून गेली. दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, तुमचे प्रेम शक्य होणार नाही आणखी एका युजरने म्हटले आहे की का भाऊ का? तर चौध्या एका युजरने म्हटले आहे की, कर्म. हा व्हिडिओ सर्वजण शेअर करत आहेत.