
US F-16 fighter jet crashes in California pilot saves life video gone viral of accident
US F-16 crash California : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया येथे बुधवारी एक धक्कादायक घटना घडली असून, अमेरिकी हवाई दलाच्या ‘थंडरबर्ड्स’ या सुप्रसिद्ध एरोबॅटिक स्क्वॉड्रनचे एफ-१६ फायटिंग फाल्कन लढाऊ विमान(F-16 Fighting Falcon fighter jet) प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. सदरील विमान डेथ व्हॅलीच्या दक्षिणेकडील ट्रोना विमानतळाजवळील एका दुर्गम वाळवंट क्षेत्रात स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे १०:४५ वाजता जमिनीवर आदळले.
व्हिडिओ फुटेजमध्ये लढाऊ विमान जोरात जमिनीवर कोसळताना, त्यानंतर आगीचा भडका उडताना आणि आकाशात काळ्या धुराचे भलेमोठे लोट पसरताना स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, या भीषण अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच पायलटने अतिशय सतर्कतेने इजेक्शन सीटचा वापर करून पॅराशूटद्वारे विमानातून बाहेर उडी घेतली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला
थंडरबर्ड्स स्क्वॉड्रनने या घटनेची अधिकृत पुष्टी करणारे निवेदनही जारी केले आहे. निवेदनात “३ डिसेंबर २०२५ रोजी प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आमच्या एफ-१६सी विमानाला अपघात झाल्याची घटना घडली असून, पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आहे,” असे स्पष्ट करण्यात आले आहे. सॅन बर्नार्डिनो काउंटीच्या अग्निशमन विभागानेही घटनास्थळी त्वरित पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, त्या विमानात पायलट व्यतिरिक्त दुसरा कोणीही नसल्याची खात्री करण्यात आली आहे.
Moment F-16C fighter jet crashes near Trona Airport in California. https://t.co/ND38ddIP5B pic.twitter.com/knsgPCUFsY — Breaking911 (@Breaking911) December 3, 2025
credit : social media and Twitter
महत्त्वाचे म्हणजे, थंडरबर्ड्सच्या सहा विमानांनी आदल्या दिवशी प्रशिक्षण उड्डाणासाठी आकाशात झेप घेतली होती. मात्र, त्यापैकी केवळ पाच विमाने तळावर परतली आणि एक विमान बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली आणि काही वेळातच हे अपघातग्रस्त विमान नेव्हल एअर वेपन्स स्टेशन चायना लेकजवळ कोसळल्याचे उघड झाल.
एफ-१६ फायटिंग फाल्कन हे एक अत्यंत शक्तिशाली, वेगवान आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान असून, हवाई दलाच्या सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. या प्रकारच्या विमानांचा वापर युद्धाबरोबरच एअर शो आणि प्रात्यक्षिकांसाठी केला जातो. थंडरबर्ड्स स्क्वॉड्रन अमेरिकेच्या हवाई शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आणि नव्या पिढीला हवाई दलात सामील होण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी जगभर कार्यक्रम सादर करते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SSB Alert : India-Nepal सीमेवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; घुसखोरांना रोखण्यासाठी दोन्ही देशाने घेतला ‘हा’ कठोर निर्णय
५७व्या विंग पब्लिक अफेयर्स ऑफिसने स्पष्ट केले आहे की, अपघातस्थळाची प्राथमिक तपासणी पूर्ण करण्यात आली असून, सखोल चौकशी सुरू आहे. नेमकी तांत्रिक बिघाड, मानवी चूक की इतर कोणते कारण यामागे आहे याचा अहवाल तपासानंतर जाहीर करण्यात येईल. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.
Ans: होय, पायलटने वेळेत पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी घेतली असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
Ans: हा अपघात कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीच्या दक्षिणेकडील वाळवंटी भागात सकाळी सुमारे १०:४५ वाजता झाला.
Ans: सध्या अपघाताचे कारण तपासाधीन असून अमेरिकन हवाई दलाकडून चौकशी सुरू आहे.