पाकिस्तानात काय चाललंय? आता असीम मुनीर यांचे जवळचे सहकारी बिलाल यांनी पंतप्रधान कार्यालयातून दिला राजीनामा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
1.असीम मुनीर यांचे जवळचे सहकारी बिलाल बिन साकिब यांनी पंतप्रधान कार्यालयातून अचानक राजीनामा दिला.
2.लष्करप्रमुखपदावरील मुनीर यांच्या नियुक्तीबाबत सरकार आणि शरीफ कुटुंबात मतभेद उघड झाले आहेत.
3. या घडामोडींमुळे पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Blockchain advisor Bilal leaves PMO : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकीय वर्तुळात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे बिलाल बिन साकिब यांनी पंतप्रधान कार्यालयातून राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मे २०२५ मध्ये बिलाल यांची पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांना मंत्रिपदासमान दर्जा देण्यात आला होता. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांनी अचानक हे पद सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पाकिस्तानात ‘नक्की चाललंय काय?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा राजीनामा अशा काळात आला आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुखपदाच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. असीम मुनीर यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपला असून, त्यांना संरक्षण प्रमुख म्हणून कायम ठेवण्याबाबतची अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही. सामान्यपणे हे काम औपचारिकतेचे असते, परंतु यावेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यातील तणावामुळे हा निर्णय रखडल्याची चर्चा आहे. याच दरम्यान शाहबाज शरीफ यांनी अचानक पाकिस्तान सोडल्याचे वृत्त समोर आले असून, ते आपल्या मोठ्या भावाशी म्हणजेच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी लंडनला गेल्याचे सांगितले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Pakistan युद्धाला इस्लामी कट्टरपंथी Asim Munir जबाबदार; अलिमा खान यांचे ‘मुल्ला जनरल’वर गंभीर आरोप
नवाज शरीफ हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असून, पाकिस्तानमधील मोठ्या राजकीय आणि लष्करी निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव अजूनही कायम आहे. लष्करासोबत कोणताही मोठा करार किंवा निर्णय घेताना नवाज शरीफ यांची संमती घेतली जाते, असा संकेत पाकिस्तानी राजकारणातील जाणकारांकडून दिला जातो. त्यामुळे, असीम मुनीर यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय नवाज शरीफ यांच्या भूमिकेवर अवलंबून असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळेच अब्जावधींच्या लोकसंख्येच्या या देशात सत्तेच्या केंद्रस्थानी अस्थिरता निर्माण झाली आहे.
दरम्यान, बिलाल बिन साकिब हे केवळ राजकीय व्यक्ती नव्हते, तर ते एक प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी व्यवसायात प्रवेश केला आणि वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी “वन मिलियन मील्स” हा सामाजिक उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे त्यांना पाकिस्तानमधील विविध संस्थांशी जवळीक साधता आली आणि नंतर असीम मुनीर यांच्या शिफारसीवरूनच त्यांची पंतप्रधान कार्यालयात विशेष सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली होती.
त्यांची नियुक्ती मुख्यतः क्रिप्टोकरन्सी, डिजिटल चलन आणि ब्लॉकचेनसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक सल्ल्यासाठी करण्यात आली होती. अशा महत्त्वाच्या भूमिकेत असतानाही त्यांनी अचानक राजीनामा देणे ही साधी घटना नसून, पडद्यामागे मोठे राजकीय समीकरण बदलत असल्याचे संकेत यातून मिळतात. काही विश्लेषकांच्या मते, हा राजीनामा पाकिस्तानातील नागरी सरकार आणि लष्कर यांच्यातील वाढत्या अंतराचे प्रतीक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CDF Delay : पाकिस्तानच्या सत्ताकारणाची लंडनमध्ये लिहिली जातेय स्क्रिप्ट; आता नवाज शरीफ करणार असीम मुनीरसोबत मोठा गेम
या सगळ्या परिस्थितीमुळे, पाकिस्तान पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महागाई, बेरोजगारी, परकीय कर्जाचा बोजा आणि अंतर्गत सुरक्षा समस्या अशा अनेक संकटांत अडकलेल्या पाकिस्तानसाठी ही सत्तासंघर्षाची नवी लाट अत्यंत घातक ठरू शकते. शाहबाज शरीफ इस्लामाबादला परतल्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होईल, पण तोपर्यंत पाकिस्तानातील सत्ताकेंद्रात अस्वस्थता कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ans: असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांच्यातील मतभेद आणि वाढता राजकीय तणाव हे प्रमुख कारण मानले जात आहे.
Ans: नवाज शरीफ यांची अंतिम संमती आणि सरकार-लष्करातील मतभेद यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे.
Ans: राजकीय अस्थिरता वाढून आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.






